पालखी मार्गावर अपघात; एक ठार

By Admin | Updated: July 8, 2014 00:45 IST2014-07-08T00:45:58+5:302014-07-08T00:45:58+5:30

एक कामगार ठार

Accident on Palkhi Road; One killed | पालखी मार्गावर अपघात; एक ठार

पालखी मार्गावर अपघात; एक ठार


अकलूज : पुणे-पंढरपूर पालखी मार्गावर वारकरी असलेल्या टेम्पो - मोटरसायलची धडक होऊन एक कामगार ठार झाला. सोमवारी सकाळी ८ वाजता ही घटना घडली.
माळशिरस तालुक्यातील चौंडेश्वरवाडी येथील समीर प्रभाकर निंबाळकर (वय २७) हा सकाळी ८ च्या सुमारास सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याकडे निघाला होता. तो त्या कारखान्यामध्ये बॉयलर फायरमन म्हणून काम करीत असून, कारखान्याकडे जाताना टेम्पोला (क्र. एम. एच. १८ / ए. ७७४८) मोटरसायकल (क्र. एम. एच. ४५ / पी. ४५६४) ची धडक झाली. यामध्ये तो जागीच मरण पावला. या घटनेची नोंद वेळापूर पोलीस ठाण्यात झाली असून, तपास सपोनि नामदेवराव शिंदे करीत आहेत.

Web Title: Accident on Palkhi Road; One killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.