शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीहून पंढरपूरला निघालेला टेम्पो चालकाच्या डुलकीमुळे उलटला; अपघातात एक ठार, तेरा जखमी

By दिपक दुपारगुडे | Updated: December 21, 2023 16:52 IST

कुर्डूवाडी-शेटफळ रस्त्यावरील घटना.

दीपक दुपारगुडे, सोलापूर : हिंगोली जिल्ह्यातून पंढरपूरकडे निघालेला टेम्पो चालकास लागलेल्या डुलकीमुळे उलटला. अपघातामध्ये एक ठार तर तेरा जण जखमी झाले. हा अपघात कुर्डूवाडी-शेटफळ रस्त्यावरील बावी गावच्या शिवारात झाला.

पुण्यतिथीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी वरूड (ता. सेनगाव) येथून टेम्पो (एम. एच.-३८, एक्स -१४४७ ) मधून प्रवास करत असतानाच कुर्डूवाडी-शेटफळ रस्त्यावरील बावी (ता. माढा, जि. सोलापूर) येथील शिवारातील सिद्धेश्वर मंदिराजवळ पोहोचला असता चालकाला लागलेल्या डुलकीमुळे गुरुवारी सकाळी तो रस्त्याच्या कडेला अचानकपणे उलटल्याने त्यात एक जणाचा जागीच मृत्यू झाला. तर १३ जण या अपघातात जखमी झाल्याची घटना घडली आहे. यात जयजयराम काशीराम शिंदे (वय-३५ दाताळा, ता.सेनगाव) यांचा जागीच मृत्यू झाला.

सर्व जखमींना कुर्डूवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यातील काहीजण गंभीर जखमी असल्याने त्यांना सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटलला रुग्णवाहिकेने हलविण्यात आले. घटनास्थळाला कुर्डूवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक हनुमंत वाघमारे यांनी भेट देऊन पाहणी केली.

या अपघातात अर्चना केळे ( वय २२ रा. जानरुण रोडगे, ता. सेनगाव), देहुबाई ज्ञानोबा दरोगे (वय ५० रा. दाताळा, ता.सेनगाव), प्रभावती जयजयराम शिंदे (वय ३० दाताळा, ता. सेनगाव), कानबा अंबर दरोगे (वय ६० रा.दाताळा, ता.सेनगाव), ज्ञानेश्वर विठ्ठल केळे (वय २७, रा.जानरुण रोडगे), भास्कर गेनुजी गाडे (वय ४० रिधोरा, ता.सेनगाव), सुधाकर दाजीबा कोटकर (वय ५०,वरुड, ता.सेनगाव), सरस्वती गजानन शिंदे (वय ३०, रा.दाताळा, ता.सेनगाव),रुक्मिणी विठ्ठल केळे (रा. कंकरवाडी, ता.सेनगाव), चंद्रभागा संतोष नलवडे (वय ३४, तरडगाव, ता.सेनगाव), प्रयागाबाई संजय सरकटे (वय ४०, रा .समगा, ता.सेनगाव), गजानन कौतिका शिंदे (वय ३६, रा.दाताळा, ता.सेनगाव) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरAccidentअपघात