वडिलांच्या पार्थिवाच्या देहदानासाठी निघालेल्या कुटुंबाच्या कारला अपघात

By Admin | Updated: January 2, 2017 16:27 IST2017-01-02T13:58:04+5:302017-01-02T16:27:59+5:30

वडिलांच्या शवाचे देहदान करण्यासाठी निघालेल्या कुटुंबाच्या कारला अपघात झाला. यात चार जण जखमी झाले आहेत.

Accident of the family car leaving the father's body | वडिलांच्या पार्थिवाच्या देहदानासाठी निघालेल्या कुटुंबाच्या कारला अपघात

वडिलांच्या पार्थिवाच्या देहदानासाठी निघालेल्या कुटुंबाच्या कारला अपघात

ऑनलाइन लोकमत

सोलापूर, दि. 2 - वडिलांच्या पार्थिवाचे देहदान करण्यासाठी निघालेल्या कुटुंबाच्या कारला अपघात झाला. यात चार जण जखमी झाले आहेत. सोलापूरपासून 17 किलोमीटर अंतरावर असलेल्या नान्नज गावाजवळ सकाळी 11.45 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.  
 
बार्शी येथे निधन झालेल्या वडिलांचे देहदान करण्यासाठी त्यांचे नातेवाईक सोलापूर येथील व्ही एम मेडिकल कॉलेजमध्ये निघाले होते. डेडबॉडी शववाहिकेत होती तर इतर लोकं कारमध्ये बसले होते. सोलापूरजवळ आल्यावर समोरुन येणारी एसटीबसची कारला धडक बसली. 
 
यात कारमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले. मात्र कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले.  
 

Web Title: Accident of the family car leaving the father's body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.