सोलापूर : सोलापूर शहरापासून काही अंतरावर असलेल्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावात एक दुर्घटना घटना घडली आहे. पोहायला गेलेले दोघे पाण्यात बुडाले असून तिघांचा जीव वाचला असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. विहिरीचा दगडी भाग कोसळून हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावातील सहा ते सात मुले गुरुवारी दुपारी पोहण्यासाठी विहिरीत गेले होते. ज्या बाजूला विहिरीची बांधलेली भिंत पडली त्या बाजूला पोहत असलेले दोघे दगड मातीच्या खाली दबले गेल्याचे सांगण्यात आले. बाकीचे दुसऱ्या बाजूला असलेले वाचलेत, असे समजले. किती जण पाण्यात बुडाले? किती जणांचा मृत्यू झाला? याबाबतची अंतिम माहिती अद्याप पोलिसांकडून मिळाली नाही.