अल्पवयीन मुलीवर अत्याचार, तरुणावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:56 IST2021-01-13T04:56:11+5:302021-01-13T04:56:11+5:30

वारंवार अत्याचार होत असतानाही त्या अल्पवयीन मुलीने काहीच सांगितले नाही. ती मुलगी गरोदर राहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. पीडित ...

Abuse of a minor girl, filing a case against a youth | अल्पवयीन मुलीवर अत्याचार, तरुणावर गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, तरुणावर गुन्हा दाखल

वारंवार अत्याचार होत असतानाही त्या अल्पवयीन मुलीने काहीच सांगितले नाही. ती मुलगी गरोदर राहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. पीडित मुलीचा भाऊ पुणे येथे कामाला असल्यामुळे वृद्ध आई-वडिलांकडे ती अल्पवयीन मुलगी राहत होती. शाळा सुटल्यानंतर ती घरीच आपल्या कुटुंबीयांना मदत करत होती. गावातीलच तरुण सोनू हा गुंडगिरी प्रवृत्तीचा असल्याने त्याच्यापासून ती अंतर पाळूनच होती. पण तो तिचा पिच्छा सोडत नव्हता.

एके दिवशी घरी कोणीच नसल्याचे पाहून सोनूने धमकी देऊन अत्याचार केले. हा प्रकार वारंवार होत गेला. तू कोठे माझे नाव घेतले तर कुटुंबाला संपवण्याची धमकी देत होता. तसेच त्याच्यापासून कुटुंबीयांना धोका असल्याचे तिने फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी सोनू उर्फ वैजिनाथ बंडगर याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Abuse of a minor girl, filing a case against a youth