फरार आरोपी 20 वर्षांनंतर पकडला व पुन्हा निसटला

By Admin | Updated: July 14, 2017 12:16 IST2017-07-14T12:16:00+5:302017-07-14T12:16:00+5:30

दरोडा व हत्येच्या गुन्हा असलेल्या फरार आरोपी तीन महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. विशेष म्हणजे हा आरोपी 20 वर्षांपासून होता.

The absconding accused caught 20 years later and again escaped | फरार आरोपी 20 वर्षांनंतर पकडला व पुन्हा निसटला

फरार आरोपी 20 वर्षांनंतर पकडला व पुन्हा निसटला

>सचिन कांबळ/ऑनलाइन लोकमत 
पंढरपूर, दि. 14 - दरोडा व हत्येच्या गुन्हा असलेल्या फरार आरोपी तीन महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. विशेष म्हणजे हा आरोपी 20 वर्षांपासून होता.  मात्र आजारी असल्याचा बहाणा करून त्यानं पुन्हा पळ काढला आहे. या प्रकरणात पोलिसांचा हलगर्जीपणा असल्याचे म्हटले जात आहे. 
 
संजय श्रीरंग काळेविरोधात दरोडा व खून केल्याची तक्रार १९९६ साली दाखल झाली होती. तो गेल्या २० वर्षांपासून फरार होता. तो करमाळा येथे नाव बदलून राहत असल्याची माहिती पंढरपूर तालुका पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेऊन अटक केली. गेल्या तीन महिन्यांपासून तो सबझेल येथे होता. 
 
१० जुलै २०१७ रोजी संजय काळेला श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. तीन दिवसांपासून त्याच्यावर उपचार सुरु होते. शौचालयास जाण्याच्या बहाण्याने त्याने पलायन केले. आरोपीने पलायन केल्याची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी निखील पिंगळे व पोनि विठ्ठल दबडे यांनी त्याला शोधण्यासाठी दोन पथक विविध ठिकाणी पाठविली आहे. 
 

Web Title: The absconding accused caught 20 years later and again escaped