शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

 विठ्ठल साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अभिजित पाटील तर व्हाइस चेअरमनपदी प्रेमलता रोंगे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2022 15:20 IST

 कारखान्याच्या ४५ वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच पाहिला उपाध्यक्ष मान मिळाला.

पंढरपूर : पंढरपूर येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी अभिजीत पाटील यांचे तर उपाध्यक्षपदी प्रेमलता रोंगे यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली.

कारखान्याच्या नूतन संचालकांची आज कारखाना कार्यस्थळावर निवडणूक निर्णय अधिकारी नागेश पाटील यांच्या उपस्थितीत सभा पार पडली. यामध्ये अध्यक्षपदी अभिजीत पाटील यांची तर उपाध्यक्षपदी  प्रेमलता रोंगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.  कारखान्याच्या ४५ वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच पाहिला उपाध्यक्ष मान मिळाला.

विठ्ठल कारखान्याच्या चाव्या तिसऱ्यांदा पाटलाच्या हाती

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची स्थापना तत्कालीन चेअरमन कर्मवीर कै. औदुंबरअण्णा पाटील यांनी केली आहे. औदुंबरअण्णा पाटील यांच्या कारकिर्दीचे, उत्कृष्ट कारभाराचे आजही राज्यभर दाखले दिले जातात. त्यांच्यानंतर कै. राजाभाऊ पाटील, कै. वसंतदादा काळे, कै. भारत भालके आणि भगीरथ भालके यांनी कारखान्याचे चेअरमन म्हणून काम पाहिले. 

मागील चार वर्षांपासून कारखान्यावर अधिक कर्जांचा डोंगर झाला. यामुळे अनेक शेतकरी संघटना, सभासदांनी आंदोलन केले. यामुळे जशी अण्णांची कारकिर्द उत्कृष्ट कारभार म्हणून ओळखली जात होती. त्याप्रमाणे भालके यांची कारकिर्द आंदोलने गाजली आहेत. परंतु मागील १५ दिवसांत झालेल्या कारखान्याच्या निवडणुकीत भालके गटाचा पराभव करत अभिजीत पाटील यांनी विजय मिळवला. कारखान्याचे चेअरमन होणारे तिसरे पाटील आहेत. यामुळे हे पाटील कारखान्याला डबघाईतून वर काढतील, कारखाना बंद पाडतील की, सुरू करतील. सभासद, ठेकेदारांची देणी देतील का? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखानेPandharpurपंढरपूरElectionनिवडणूकPoliticsराजकारण