शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

अबब... उजनी धरणात पकडली ११० किलो वजनाची मगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 10:38 IST

मच्छीमार बांधवांचे साहस: दोन तास चालला थरार; दहा फूट लांब, तीन फूट रुंद

ठळक मुद्देगेल्या चार दिवसांपासून सोलापुरात मगर आढळल्याची चर्चाअखेर पकडलेली ही मगर वनविभागाकडे सुपूर्द करण्यात आलीतीन तास उलटून गेले तरी वनविभागाचा एकही अधिकारी आला नव्हता

भीमानगर: गेल्या चार दिवसांपासून सोलापुरात मगर आढळल्याची चर्चा सुरू असताना आज (रविवारी) उजनी धरणामध्ये चक्क ११० किलो वजनाची मगर मच्छीमार बांधवांनी जीव धोक्यात घालून पकडली. तब्बल दोन तास हा थरार सुरू होता. अखेर पकडलेली ही मगर वनविभागाकडे सुपूर्द करण्यात आली.

रविवारी सकाळी सहाच्या सुमारास भीमानगर येथील मच्छीमार बांधव मासे पकडण्यासाठी उजनी धरणाच्या काठावर गेले. धरणावर ड्यूटीसाठी असलेल्या साखरे यांनी त्यांना थांबवले. धरणाच्या काठावर मगर असल्याचे त्यांनी सांगितले. मग तिला जेरबंद करण्यासाठी साखरे यांनी प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन आजूबाजूच्या लोकांना सांगितले. मच्छीमार बांधवांनी आपल्या सहकाºयांना फोन करून बोलावले. साधारण १० फूट लांब व तीन फूट रुंद असलेली अन् १०० ते ११० किलो वजन असलेली मगर काठावर ऐसपैस पसरून बसल्याचे सर्वांनी पाहिले.

भीमानगरच्या मच्छीमार बांधवांनी अन्य नागरिकांच्या सहकार्याने दोरखंड, जाळ्यांच्या साह्याने जेरबंद करण्यासाठी प्रयत्न चालवला. तब्बल दोन तास हा थरार सुरू होता. दरम्यान, सकाळी सहा वाजताच मच्छीमार बांधवांनी ही खबर सोशल मीडियावर पोस्ट केली. परंतु वनविभागाला, पोलीस स्टेशनला खबर देऊनही तीन तास उलटून गेले तरी वनविभागाचा एकही अधिकारी आला नव्हता. 

धरणावर मगर दिसल्याच्या वार्तेने बघ्यांची एकच गर्दी उसळली. त्यांना पांगवण्यासाठी अनेकांना शिकस्त करावी लागली. काही हौशी मंडळी मगरीसमवेत सेल्फी घेण्यात धन्यता मानत असल्याचेही चित्र दिसून आले. या पकडलेल्या मगरीजवळ वनविभाग कर्मचाºयाचे बंदोबस्त नसल्याने जो येईल तो हात लावून मगरीच्या अंगावरून हात फिरवत होता. यामुळे कदाचित मगर सुटली असती तर मोठा अनर्थ झाला असता. मात्र चार तासांनंतर दहा वाजता वनविभागाचे कर्मचारी येऊन मगरीला घेऊन गेले. वन अधीक्षकांच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही केली जाईल, असे सांगण्यात आले. 

धरण काठावर दहशत; कर्मचारी नियुक्तीची मागणी - मगर दिसल्याच्या वार्तेने उजनी जलाशय काठच्या लोकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. गेल्या तीन वर्षांपासून धरणात मगरी आहेत, अशा चर्चा सुरू होत्या. आज प्रत्यक्षात पाहायला मिळाले. अजूनही उजनीत मगरी आहेत, यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. यामुळे नागरिकांमधून कायमस्वरूपी वन विभागाकडून एका कर्मचाºयाची नियुक्ती करावी, दररोज गस्त घालण्याची मागणी नेताजी चमरे यांच्यासह मच्छीमार बांधवांनी केली आहे. 

यांनी  दाखवले साहस-  ही मगर पकडण्यासाठी महादेव नगरे, मामू भोई, शांतिलाल नगरे, नितीन सल्ले, सूरज नगरे, अशोक पतुले, नेताजी चमरे, दशरथ पतुले, संदीप खानेवाले, रवींद्र नगरे, पिंटू सल्ले, अशोक चमरे, भगवान भोई, मामू खानेवाले, हनुमंत माने, धनाजी कारंडे, नाना मेटे व मच्छीमार बांधवांनी मदत केली.

दीड वर्षापूर्वी करमाळा तालुक्यातही पाहिली मगर

  • - उजनी धरणामध्ये यापूर्वीपासून मगरींचे वास्तव्य आहे, अशा पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. दीड वर्षांपूर्वी करमाळा तालुक्यातील नदीकाठच्या गावातील मच्छीमार लोकांना पाहायला मिळाली होती, नागरिकांमध्ये चर्चा सुरू होती. मात्र अद्यापपर्यंत कोणावर हल्ला झाला नसल्याचे  सांगण्यात आले. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून वनविभागाने दखल घ्यावी, असे नागरिकांचे म्हणणे  आहे. 
  • -  वनविभागाच्या कर्मचाºयांनी सांगितले, तूर्तास तरी ही आमच्या ताब्यात घेऊन जातोय. वनअधीक्षक सांगतील त्याप्रमाणे पुढील कार्यवाही केली जाईल.
  • -  वनविभागाने आतातरी उजनी वसाहतीत एका कायमस्वरूपी वनकर्मचाºयाची नेमणूक करून त्याच्यावर रोज गस्त घालण्याची जबाबदारी  सोपवावी, अशी मागणी मच्छीमार बांधवांच्या वतीने नेताजी चमरे, भीमानगर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
टॅग्स :SolapurसोलापूरUjine Damउजनी धरणwater shortageपाणीकपात