शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

व्याजाचे पैसे न दिल्यावरुन तरुणाला जमावाकडून फायटरनं बेदम चोप; १० जणांवर सावकारी गुन्हा दाखल

By विलास जळकोटकर | Updated: October 9, 2023 18:18 IST

व्याजाची रक्कम न दिल्याच्या कारणावरुन चिडून दहाजणांनी मिळून तरुणाला फायटरने बेदम मारहाण करुन जखमी करण्याचा प्रकार शहरातील मड्डी वस्ती प्रियंका चौकात घडला.

सोलापूर : व्याजाची रक्कम न दिल्याच्या कारणावरुन चिडून दहाजणांनी मिळून तरुणाला फायटरने बेदम मारहाण करुन जखमी करण्याचा प्रकार शहरातील मड्डी वस्ती प्रियंका चौकात घडला. यामध्ये मक्तूम बाशा जातकर (वय- २५, रा. मड्डी वस्ती, सोलापूर) हा गंभीर जखमी झाला. त्याने दिलेल्या तक्रारीवरुन जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात सावकारीचा गुन्हा नोंदला आहे.

विशाल कतारी, अजय कतारी, शंकर कतारी, संजय कतारी, विकास राजपूत, आर्य राजपूत, अर्जुन कतारी (सर्व रा. वीर तपस्वी शाळेसमोर, सोलापूर) व अन्य तिघे अशी गुन्हा नोंदलेल्यांची नावे आहेत.फिर्यादीत म्हटले आहे की, फिर्यादी मक्तूम याने विशाल कतारी याच्याकडून तीन वर्षांपूर्वी १० हजार रुपये २० टक्के दराने घेतले होते. पैसे घेतानाच पहिल्या महिन्याचे २ हजार रुपये व्याज कमी करुन ८ हजार रुपये दिले होते. त्यानंतर एक वर्ष २ हजार रुपये असे एकूण २४ हजार रुपये फिर्यादीने व्याजापोटी दिले.

एकेदिवशी त्याने फिर्यादीच्या चुलतभावाला पैसे घेतल्याबद्दल कल्पना दिली. त्याने ४ हजार रुपये मुद्दमालपोटी त्याला दिले. व फिर्यादीनेही २ हजार रुपये दिल्याने मुद्दलोटी केवळ ४ हजार रुपये देणे होते. सकाळी मडडी वस्ती येथील प्रियंका चौकात फिर्यादीला गाठून राहिलेले पैसे दे म्हणून फिर्यादीच्या खिशातील ३५० रुपये काढून घेतले. आणि त्याच्या वरील साथीदारांनी फायटरने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी या प्रकरणी फिर्यादीवरुन वरील सर्वांविरुद्ध सावकारी अधिनियमान्वये गुन्हा नोंदला आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारी