सोलापूर : गांजा विकायला निघालेल्या तरुणाला पाठलाग करुन पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2023 17:42 IST2023-04-29T17:42:11+5:302023-04-29T17:42:35+5:30
येथील न्यायालयात हजर केले असता न्या. जे. आर. पठाण यांनी दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली.

सोलापूर : गांजा विकायला निघालेल्या तरुणाला पाठलाग करुन पकडले
सोलापूर : विक्रीसाठी गांजा घेऊन आलेल्या तरुणाला बार्शी शहर पोलिसांच्या पथकाने पाठलाग करुन पकडले. त्याला येथील न्यायालयात हजर केले असता न्या. जे. आर. पठाण यांनी दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली.
अक्षय अर्जुन गाडे (वय २९, रा.वाणी प्लॉट न.२, बार्शी) असे पोलीस कोठडीतील आरोपीचे नाव असून पोलिसांनी २८ एप्रिल रोजी सांयकाळी बार्शी शहरात आझाद चौकातील एका हॉटेलजवळ ही कारवाई केली. याबाबत पोलिस कॉन्स्टेबल अर्जुन गोसावी यांनी फिर्याद दिली असून त्याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस सूत्राकडील माहितीनुसार जवळ गांजा बाळगून त्याची विक्री करण्यासाठी एक तरुण शहरात फिरत असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली होती.
शहर पोलिस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक तोडरमल, हेड कॉन्स्टेबल चौघुले, पोलीस नायक माने , मुळे, साबळे, घोंगडे, जाधव यांच्या पथकाने आझाद चौकात सापळा रचला. एका हॉटेलजवळ तो येताच पोलिसांना पाहून तो पळत सुटला. पोलिसांचा अंदाज खरा ठरला आणि त्यांनी त्याचा पाठलाग करुन पकडले. त्याच्या जवळील पिशवीत तीन हजारांचा गांजा आणि रोख ८०० रुपये मिळाले. पोलिसांनी ते जप्त केले. याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.