सोलापूर : रस्ता ओलांडाताना अज्ञात वाहनाच्या धडकेत तरूणाचा मृत्यू

By रूपेश हेळवे | Updated: May 5, 2023 17:35 IST2023-05-05T17:35:16+5:302023-05-05T17:35:52+5:30

तळे हिप्परगा येथील मंदीरा समोरील रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एका तरूणाचा मृत्यू झाला.

A young man died in a collision with an unknown vehicle while crossing the road | सोलापूर : रस्ता ओलांडाताना अज्ञात वाहनाच्या धडकेत तरूणाचा मृत्यू

सोलापूर : रस्ता ओलांडाताना अज्ञात वाहनाच्या धडकेत तरूणाचा मृत्यू

सोलापूर : तळे हिप्परगा येथील मंदीरा समोरील रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एका तरूणाचा मृत्यू झाला. शिवशरण नागू चौगूले ( वय ३५, रा. गणपती घाट, तळे हिप्परगा) असे मृत तरूणाचे नाव आहे. ही घटना गुरूवारी रात्री घडली.

मृत शिवशरण हे तळे हिप्परगा येथे राहत असून ते रात्री हायवेजवळ रस्ता ओलांडताना त्यांना अज्ञात चार चाकी वाहनाने जोरात धडक दिली. या धडकेत शिवशरण हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान, धडक देणारे वाहन न थांबता निघून गेले. या घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे.

Web Title: A young man died in a collision with an unknown vehicle while crossing the road