ट्रॅक्टरमधून तोल जाऊन पडल्याने तरुणाचा मृत्यू
By शीतलकुमार कांबळे | Updated: October 28, 2023 15:24 IST2023-10-28T15:24:53+5:302023-10-28T15:24:56+5:30
उपचारापूर्वीच कलिम मृत पावल्याचे डॉक्टरांनी तपासणीनंतर घोषित केले. या घटनेची नोंद सिव्हील पोलीस चौकीत झाली आहे.

ट्रॅक्टरमधून तोल जाऊन पडल्याने तरुणाचा मृत्यू
सोलापूर : ट्रॅक्टरमधून जाताना अचानक तोल गेल्याने खाली पडलेल्या तरुणाचा मृत्यू झाला. शुक्रवारी रात्री ९ च्या सुमारास इटकळजवळील भैरवनाथ पोल्ट्रीफार्मजवळ ही घटना घडली. शेख कलिम सलादिन (वय २८, रा. एमआयटी कॉलेज, लातूर) असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे.
कलिम हा शुक्रवारी रात्री लातूर येथून सोलापूरच्या दिशेने ट्रॅक््टरमध्ये बसून येत होता. तुळजापूर तालुक्यातील इटकळ परिसरात रात्री ९ च्या सुमारास ट्रॅक्टर आला. तेंव्हा अचानक कलिम तोल जाऊन धावत्या ट्रॅक्टरमधून खाली पडल्याने जखमी होऊन त्याची शुध्द हरपली. त्यास त्या अवस्थेत रुग्णवाहिकेतून रात्री १०.४० च्या सुमारास शासकीय रुग्णालयात उपचारास दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच कलिम मृत पावल्याचे डॉक्टरांनी तपासणीनंतर घोषित केले. या घटनेची नोंद सिव्हील पोलीस चौकीत झाली आहे.