शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

हिजाब घालणारी महिला एक दिवस पंतप्रधान बनेल; असदुद्दीन ओवेसी यांचे मोठे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 18:33 IST

सोलापूरच्या सभेत ओवेसी बोलत होते.

आप्पासाहेब पाटील/सोलापूर : पाकिस्तानच्या घटनेत लिहिलेले आहे की एकाच धर्माचा माणूस राष्ट्रध्यक्ष बनू शकतो, इतर कोणी नाही. पण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेत कोणताही भारतीय व्यक्ती पंतप्रधान बनू शकतो. एक दिवस असा येईल की, हिजाब घालणारी महिला या देशाची पंतप्रधान बनेल असा विश्वासही असदुद्दीन ओवेसी यांनी सोलापूरच्या सभेत व्यक्त केला.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे नरेंद्र मोदीच्या कुशीत बसले आहेत. अजित पवारांना व्होट म्हणजे मोदींना व्होट. अजित पवारला व्होट म्हणजे मोदींनी आणलेल्या वक्फ कायद्याला समर्थन. अजित पवारांना दर्गा, मशिदीशी काही घेणे-देणे नाही, पण आपल्याला आहे. मोदी, शिंदे, अजित पवार ही त्रिमूर्ती ही एकच आहेत. ते तुमच्यासमोर येऊन तुमच्या डोळ्यात धूळफेक करतील, त्यांना मतपेटीतून उत्तर द्या असे आवाहन ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) चे नेते खा. असदुद्दीन ओवेसी यांनी केले.

इतक्या वर्षे सत्तेत असलेल्या भाजप, राष्ट्रवादी व शिवसेनापक्षाने काहीच केलं नाही. महागाई वाढली, अत्याचाराच्या घटना वाढल्या, महागाई वाढल्याचेही ते म्हणाले. आमच्या युवा कार्यकर्त्याने इस्त्रायलचा निषेध केला तर त्याच्यावर गुन्हा दाखल केला. बहुतेक गुन्हा दाखल करणारा नेत्यानाहूचा पुतण्या असेल, त्याचा नाव नेत्यानाहूचा पुतण्या म्हणूनच ओळखलं जाईल अशी टीका ओवेसी यांनी केली. शेतकरी आत्महत्या, अल्पसंख्याक लोकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणारं हे शासन असल्याचेही ते म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Hijab-wearing woman will be Prime Minister one day: Owaisi's statement.

Web Summary : Owaisi believes a hijab-wearing woman could become India's Prime Minister. He criticized BJP, NCP, and Shiv Sena, alleging inaction on inflation and minority issues. He urged voters to reject the Modi-Shinde-Pawar alliance.
टॅग्स :Solapur Municipal Corporation Electionसोलापूर महानगरपालिका निवडणूक २०२६Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन