सोलापुरात पाठिमागून येणाऱ्या रिक्षानं धडक दिल्यानं महिलेचा मृत्यू
By विलास जळकोटकर | Updated: April 17, 2023 16:50 IST2023-04-17T16:50:33+5:302023-04-17T16:50:41+5:30
ही घटना सोमवारी (दि. १७) पहाटे ५:३० च्या सुमारास छत्रपती संभाजी महाराज तलाव ब्रीजवरील रोडवर घडली.

सोलापुरात पाठिमागून येणाऱ्या रिक्षानं धडक दिल्यानं महिलेचा मृत्यू
सोलापूर : सोरेगावहून सोलापूरकडे दुचाकीवरुन निघालेल्या दोघांना पाठिमागून येणाऱ्या रिक्षानं जोराची धडक दिल्याने यामध्ये रोडवर पडून दोघे गंभीर जखमी झाले. यातील एका महिलेचा रुग्णालयात दाखल केले असता उपचार सुरु असताना मृत्यू झाला तर एकावर उपचार सुरु आहेत. ही घटना सोमवारी (दि. १७) पहाटे ५:३० च्या सुमारास छत्रपती संभाजी महाराज तलाव ब्रीजवरील रोडवर घडली.
यातील जखमी सुशीला सिद्राम कर्जाळ (वय- ५५) व काशिनाथ शिरेप्पा बिराजदार (वय- ५५, दोघे रा. एसआरपी कॅम्प, सोलापूर) हे दोघे सोमवारी पहाटेच्या सुमारास सोरेगावहून शहराकडे दुचाकीवरुन येत होते. त्यांची दुचाकी छत्रपती संभाजी महाराज तलावाजवळील ब्रीजच्या रोडवर आली असताना पाठिमागून वेगात येणाऱ्या रिक्षाने धडक दिली. यामध्ये दुचाकीवरुन दोघेही खाली पडले. दोघांच्याही डोक्याला गंभीर मार लागला.
अशाही स्थितीत काशिनाथ व सुशीला यांनी उपचारासाठी शासकीय रुग्णालय रुग्णालय गाठले. यामध्ये सुशीला या बेशुद्धावस्थेत होत्या.
यातील सुशीला यांच्यावर उपचार सुरु असताना डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने ६:४० च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दुसरे जखमी काशीनाथ बिराजदार यांच्यावर उ्पचार सुरु आहेत. सिव्हील चौकीत या अपघाताची नोंद झाली आहे.