धक्कादायक! ‘माझ्याकडं का बघतो’ म्हणत हाणला डोक्यात कोयता अन् ...

By विलास जळकोटकर | Updated: May 25, 2023 12:05 IST2023-05-25T12:04:18+5:302023-05-25T12:05:09+5:30

बार्शी तालुक्यातील श्रीपतपिंपरीत घडला प्रकार.

A thrashing was done for a minor reason at Barshi | धक्कादायक! ‘माझ्याकडं का बघतो’ म्हणत हाणला डोक्यात कोयता अन् ...

धक्कादायक! ‘माझ्याकडं का बघतो’ म्हणत हाणला डोक्यात कोयता अन् ...

सोलापूर : ‘माझ्याकडं थांबून का बघतो’ असे म्हणत डोक्यात कोयता घालून गंभीर जखमी केले. डोक्यातून भळाभळा रक्त वाहिलं. सोडवण्यासाठी आलेल्या जखमीच्या बहिणीलाही हातानं मारहाण करण्यात आली. बुधवारी सकाळी १०.३० च्या सुमारास श्रीपत पिंपरी येथील जखमीच्या शेतामध्ये ही घटना घडली.

या मारहाणीमध्ये अण्णासाहेब माधव कासार (लाकुळे) हा जखमी झाले. मारहाण केल्याप्रकरणी ज्ञानेश्वर दशरथ बारंगुळे (वय- २४, रा. पाटील प्लॉट, बार्शी) व अनिल (पूर्ण नाव नाही) या दोघांविरुद्ध गुन्हा नोंदला आहे.

यातील जखमी फिर्यादी अण्णासाहेब बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास हा शेतातील सामाईक विहिरीजवळ थांबला होता. वरील दोघांनी त्याला ‘तु माझ्याकडे का बघतोस’ असे म्हणत शिव्या देऊ लागला. हातातल्या कोयत्याने डोक्यात वार करुन रक्तबंबाळ केले. ही मारहाण सोडवणाऱ्या जखमीच्या बहिणीलाही त्यांनी हातानं मारहाण केली. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही. बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे. तपास पोलीस नाईक डोंगरे करीत आहेत.

Web Title: A thrashing was done for a minor reason at Barshi