चहा विक्रेत्यास दोघांनी केली सोलापूर रेल्वे स्टेशनवर सळईने मारहाण
By संताजी शिंदे | Updated: September 17, 2023 17:28 IST2023-09-17T17:28:42+5:302023-09-17T17:28:52+5:30
याप्रकरणी दोघांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चहा विक्रेत्यास दोघांनी केली सोलापूर रेल्वे स्टेशनवर सळईने मारहाण
सोलापूर : चहा विकण्यासाठी गेल्यावर दोघांनी चहा विक्रेत्यास सळईने डोक्यास मारून जखमी केले. ही घटना रविवारी सकाळच्या सत्रात घडली. याप्रकरणी दोघांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीकांत नागनाथ मुळे (वय २३, रा. फॉरेस्ट, सोलापूर) असे जखमी तरुणाचे नाव आहे. श्रीकांत हा १७ सप्टेंबर रोजी सकाळी सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर चहा विकण्यासाठी गेला असता साडेसात वाजण्याच्या सुमारास स्टेशनवरील दोघा चहा विक्रेते प्रवीण विठ्ठल जाधव व दीपक या दोघांनी डोक्यात सळईने मारहाण केली. याशिवाय डोळ्यावर, मानेवर मारहाण केली. या घटनेनंतर श्रीकांत हा उपचारासाठी सकाळी ८ वाजता शासकीय रुग्णालयात दाखल झाला. या घटनेची नोंद सिव्हील पोलिस चौकीत झाली आहे.
या घटनेवेळी रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी झाली होती. आरपीएफ व लोहमार्ग पोलिसही घटनास्थळी दाखल झाले होते. काही काळ सोलापूर स्थानकावर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. या घटनेची माहिती मिळताच मुळे कुटुंबियांनी शासकीय रूग्णालयात धाव घेत श्रीकांतच्या तब्यतेची विचारपूस केली.