भरधाव जीपची पाठीमागून धडक; दुचाकीवरील मायलेक गंभीर जखमी
By काशिनाथ वाघमारे | Updated: November 21, 2023 19:26 IST2023-11-21T19:26:27+5:302023-11-21T19:26:37+5:30
सांगोला- महुद रोडवरील पेट्रोल पंपाजवळ पाठीमागून भरधाव येणा-या जीपने दुचाकीला जोरात धडक दिली.

भरधाव जीपची पाठीमागून धडक; दुचाकीवरील मायलेक गंभीर जखमी
सोलापूर : भरधाव वेगात येणा-या जीपने दुचाकीला धडक दिली. या अपघातात मोटरसायकलवरील माय-लेक जखमी झाले असून ते तिसऱ्या दिवसाच्या विधीसाठी निघाले होते. सांगोला येथील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मंगळवार, २१ नोव्हेंबर रोजी पहाटे ५.३० वा.च्या सुमारास सांगोला- महूद रोड वर पेट्रोल पंपाजवळ हा अपघात झाला. याबाबत, महादेव लक्ष्मण काटे (रा.मांजरी) यांनी जीप चालकाविरुद्ध गुन्हा फिर्याद दिली आहे.
फिर्यादी महादेव काटे हे सांगोल्यातील मांजरी येथे त्यांची आई कमल लक्ष्मण काटे यांना घेऊन मंगळवार, २१ नोव्हेंबर रोजी दुचाकीवरून (एम. एच. ४५/ एक्स. ६५१२) माळशिरस तालुक्यात कोळेगाव येथे नातेवाईकांच्या तिस-या दिवसाच्या विधीसाठी महुद मार्गे जात होते. वाटेत सांगोला- महुद रोडवरील पेट्रोल पंपाजवळ पाठीमागून भरधाव येणा-या जीपने दुचाकीला जोरात धडक दिली. अपघातानंतर चालक न थांबता जीप दामटून नेली.