सोलापूरच्या मार्केट यार्डातून चोरले साडेचार हजार रुपयांचं तुरीचे पोतं
By दिपक दुपारगुडे | Updated: January 30, 2024 19:15 IST2024-01-30T19:15:08+5:302024-01-30T19:15:17+5:30
या प्रकरणी जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला असून, तपास पोलीस नाईक बाबर करीत आहेत.

सोलापूरच्या मार्केट यार्डातून चोरले साडेचार हजार रुपयांचं तुरीचे पोतं
सोलापूर : मार्केट यार्डात विकण्यासाठी आणलेले तुरीचे पोते चोरुन नेल्याप्रकरणी तरुणाविरुद्ध तक्रारीनुसार गुन्हा नोंदला आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी मार्केट यार्डातील शिवशक्ती ट्रेडर्स येथे घडली. या प्रकरणी पंडित मोहन धनगर (वय- २८, रा. कोरेवाडी, ता. तुळजापूर) यांनी फिर्याद दिली असून, विराज हुसेनी कांबळे (वय- २४, रा. हनुमान नगर, रमाबाई आंबेडकर नगर, सोलापूर) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदला आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की, यातील फिर्यादीने ६० किलो वजन असलेले तुरीचे पोते विकण्यासाठी मार्केट यार्डात शिवशक्ती ट्रेडर्स यांच्याकडे आणले होते. सदर पोते एम. एच. १३ सी यू २१११ मध्ये असताना त्याने ते चोरुन नेले. त्याची किंमत ४ हजार ५०० रुपये असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला असून, तपास पोलीस नाईक बाबर करीत आहेत.