मोठी बातमी; अकलूजमध्ये पोलिस हवालदाराने केली राहत्या घरी आत्महत्या
By Appasaheb.patil | Updated: August 28, 2024 19:45 IST2024-08-28T19:44:59+5:302024-08-28T19:45:12+5:30
याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पत्नी व बाजूला राहणारे पोलीस अंमलदार यांनी तात्काळ उपचारासाठी वाहनातून अकलाई आय.सी. यू. सेंटर, अकलूज येथे दाखल केले.

मोठी बातमी; अकलूजमध्ये पोलिस हवालदाराने केली राहत्या घरी आत्महत्या
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथे एका पोलिस हवालदाराने राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना बुधवारी घडली. सोमनाथ हरिभाऊ कोळी (रा. पंढरपूर) असे आत्महत्या केलेल्या पोलिस हवालदाराचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, बुधवार २८ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी दीड ते अडीच वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी सोमनाथ हरिभाऊ कोळी यानी राहत्या घरातील बेडरूममधील छताच्या पंख्याला साडीने गळफास घेतला. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पत्नी व बाजूला राहणारे पोलीस अंमलदार यांनी तात्काळ उपचारासाठी वाहनातून अकलाई आय.सी. यू. सेंटर, अकलूज येथे दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच ते मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मयत पोलिस हवालदार सोमनाथ कोळी यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, भाऊ, भावजय असा परिवार आहे. या घटनेची माहिती मिळताच अकलूज उपविभागातील वरिष्ठ पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी रूग्णालयात धाव घेतली.