महावितरण अधिकाऱ्याच्या बदलीविरोधात निघाला मोर्चा

By काशिनाथ वाघमारे | Updated: July 18, 2023 16:57 IST2023-07-18T16:57:26+5:302023-07-18T16:57:46+5:30

चौकशीची मागणी : अधिकारी व ठेकेदार यांनी षडयंत्र रचल्याचा आरोप

A march started against the transfer of the Mahavitaran officer | महावितरण अधिकाऱ्याच्या बदलीविरोधात निघाला मोर्चा

महावितरण अधिकाऱ्याच्या बदलीविरोधात निघाला मोर्चा

सोलापूर : टेंभुर्णी (ता. माढ) महावितरण कार्यालयाचे सहाय्यक अभियंता विकासकुमार रस्तोगी यांच्या बदलीविरोधात वंचित बहुजन युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विभागीय अधिका-याच्या कार्यालयावर मोर्चा काढला.

टेंभुर्णी शहरात बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष साहेबराव वाघमारे, माजी जिल्हाध्यक्ष गोपाळ घार्गे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाला सुरुवात झाली. नंतर मोर्चा महावितरण कार्यालयासमोर नेण्यात आला. तेथे आंदोलनकर्त्यांनी घोषणा देऊन रस्तोगी यांची झालेली बदली रद्द करण्याच्या घोषणा दिल्या.

कार्यकर्ते म्हणाले, चौकशी करा

विद्युत मंडळातील काही अधिकारी व ठेकेदार यांनी षडयंत्र रचून रस्तोगी यांची बदली केली आहे. त्याची वरिष्ठस्तरावर चौकशी करण्यात यावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी यावेळी केली. यावेळी बार्शी विभागाचे अभियंता कुर्हाडे यांना मागण्यांचे लेखी निवेदन देऊन चर्चा केली.

Web Title: A march started against the transfer of the Mahavitaran officer