तलावावर वीज कनेक्शन जोडताना शाॅक बसल्याने शेतकरी भाजला
By विलास जळकोटकर | Updated: April 17, 2023 18:25 IST2023-04-17T18:24:56+5:302023-04-17T18:25:12+5:30
रविवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास बाभळगाव तलाव येथे ही घटना घडली.

तलावावर वीज कनेक्शन जोडताना शाॅक बसल्याने शेतकरी भाजला
सोलापूर : उन्हाळ्याचे दिवस असल्याने आणि पिकांना पाणी कमी पडू लागल्याने साठवण तलावावरुन पाईपलाईनद्वारे पाणी नेण्यासाठी वीज कनेक्शन जोडणी करताना आसाद दौलराव पाटील (वय- ३२, रा. इटकळ, ता. तुळजापूर) हा तरुण शेतकरी शॉक बसल्याने भाजला. रविवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास बाभळगाव तलाव येथे ही घटना घडली.
सध्या गावोगावी विहिरीचे, बोअरच्या पाण्याची पातळी खालावल्यामुळे जवळच असलेल्या साठवण तलावातील पाण्याचा पिकांसाठी आधार ठरु लागला आहे. शॉक बसलेले आसाद पाटील वीज खंडित झाल्यामुळे वायरची जोडणी करत असताना वायरमध्ये वीजप्रवाह येऊन हाताला जोरात शॉक बसला. इटकळ येथे प्राथमिक उपचार घेऊन त्यांना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात भाऊ अविनाश पाटील यांनी दाखल केले आहे.