शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारासोबत लहान मुलाला मतदान केंद्रात दिला प्रवेश; केंद्राध्यक्ष, पोलीस शिपाई निलंबित, निवडणूक आयोगाचा दणका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 13:49 IST

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मतदान होत असताना एका उमेदवारासह त्याच्या मुलाला प्रवेश दिल्याच्या प्रकरणात निवडणूक आयोगाने कारवाई केली आहे. 

- आप्पासाहेब पाटील, सोलापूर जिल्हा परिषद उमेदवारासोबत लहान मुलाला मतदान केंद्रात प्रवेश दिल्याप्रकरणी निवडणूक कामात हलगर्जीपणा केल्याबद्दल मतदान केंद्राचे अध्यक्ष अण्णा सावता बुद्धे व त्या ठिकाणी बंदोबस्ताला असलेले पोलीस शिपाई गजानन राऊत या दोघांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश निवडणूक आयोगाचे उपसचिव के. सूर्यकृष्णमूर्ती यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना दिले आहेत.

जिल्हा परिषदेच्या मतदानादिवशी माळशिरस तालुक्यातील फोन सिरस जिल्हा परिषद गट मतदान केंद्र क्रमांक 267/39 व गुरसाळे पंचायत समिती गण क्रमांक 73 या मतदान केंद्रावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार अर्जुन सिंह मदनसिंह मोहिते पाटील हे मतदान करण्यासाठी आले होते. 

मतदान केंद्रात प्रवेश, ईव्हीएमचे बटण दाबले

त्यांनी मतदान केंद्रात मतदान करण्यासाठी प्रवेश केल्यानंतर सोबत मुलगा होता. या मुलाला मतदान केंद्रात अटकाव करण्याची जबाबदारी मतदान केंद्राध्यक्ष अण्णा बुध्दे व पोलीस शिपाई गजानन राऊत यांची होती. पण यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने त्या मुलाने मतदान केंद्र कक्षात प्रवेश करून उमेदवारासोबत मतदानपेटी जवळ जाऊन मतदानाचे बटन दाबले. 

या प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले. ही चित्रफीत सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर याबाबत चर्चा सुरू झाली. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या आदेशान्वये यासंबंधी उमेदवाराविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला. निवडणूक आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली.

आयोगाने काय दिले आहेत आदेश?

राज्य निवडणूक आयोगाचे उपसचिव के. सूर्यकृष्णमूर्ती यांनी तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिला आहे. याप्रकरणी संबंधित केंद्रप्रमुख बुद्ध व पोलीस शिपाई राऊत यांच्याविरुद्ध निवडणूक कामात हयगय केल्याप्रकरणी निलंबनाची कारवाई करून शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्याची शिफारस करण्यात यावी, असे आदेश दिले आहेत.

तसेच याप्रकरणी संबंधित उमेदवाराविरुद्ध पुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही कारवाईचा अहवाल तात्काळ निवडणूक आयोगाला सादर करावा असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२६Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगEVM Machineईव्हीएम मशीनSolapurसोलापूर