अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन लजास्पद वर्तन, विनयभंगाचा गुन्हा दाखल
By विलास जळकोटकर | Updated: August 16, 2023 15:33 IST2023-08-16T15:32:14+5:302023-08-16T15:33:00+5:30
आई-वडील घरी नसताना घरामध्ये शिरला

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन लजास्पद वर्तन, विनयभंगाचा गुन्हा दाखल
सोलापूर: आई -वडील घरी नसताना गल्लीत राहणारा मुलाने घरामध्ये शिरुन १३ वर्षीय मुलीशी लजास्पद वर्तन केले. दोन महिन्यापासून पाठलाग करुन धमकावल्याबद्दल त्याच्याविरुद्ध सोमवारी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. दादा दोरकर असे गुन्हा नोंदलेल्या मुलाचे नाव आहे.
यातील पिडित मुलगी आपल्या आईवडिलांसमवेत राहते. १३ ऑगस्ट रोजी ती पंढरपूरला दर्शनासाठी गेली होती. वडिल रिक्षा चालवतात त्यामुळे बाहेर गेले होते. घरी कोणी नसल्याचे पाहून दोरकर घरात शिरला. यावर पिडितेने त्याला मामीला बलावून हाकलवले. घरी आल्यानंतर आईवडिलांना कल्पना दिली.
यापूर्वी सदर मुलगा दोन महिन्यांपासून शाळेला जाताना पाठलाग करीत होता. ‘तू मला आवडतेस, माझ्यासोबत बोल नाहीतर तुला मारुन टाकेन अशी धमकी दिली होती’ असे पिडितेने सांगितले. यावर पिडितेच्या आईने जोडभावी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विनयभंगाचा गुन्हा नोंदला आहे.