नवऱ्याला सोडून दे.. बायकोसारखं सांभाळतो म्हणत हात पकडणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा
By विलास जळकोटकर | Updated: October 31, 2023 18:01 IST2023-10-31T18:01:36+5:302023-10-31T18:01:40+5:30
पिडितेने एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

नवऱ्याला सोडून दे.. बायकोसारखं सांभाळतो म्हणत हात पकडणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा
सोलापूर : शिलाईचं काम आटोपून रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेला स्टॉपवर अडवून ‘नवऱ्याला सोडून दे.. तुला बायकोसारखं सांभाळतो’ म्हणत तरुणानं तिचा हात पकडून लज्जास्पद वर्तन केले. ही घटना शहरातील एका भागामध्ये घडली. या प्रकरणी विकास राधाकृष्ण पाटील (वय- ३१, रा. राजूर, ता. द. सोलापूर) या तरुणाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नोंदला आहे.
यातील पिडितेने एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यात तिने म्हटले आहे की, पिडिता ही शिलाईचे काम करुन आपली उपजीविका भागवते. नेहमीप्रमाणे सायंकाळी ती घराकडे रिक्षाने जाण्यासाठी स्टॉपवर थांबली होती. या दरम्यान आरोपी विकास हा मोटारसायकलवरुन तेथे आला. त्याने पिडितेला ‘ तू माझ्यासोबत चल, मी तुला बायकोसारखे सांभाळतो, तुझ्या नवऱ्याला सोडून दे’ म्हणून हात धरुन ओढून घेत लजास्पद वर्तन केले.एवढ्यावर न थांबआ आरोपीने पिडिता ज्या रिक्षात बसली त्या रिक्षाचा पाठलाग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी तपास सुरु आहे.