पर्यटनाच्या पॅकेजपेक्षा अधिक रक्कम घेतल्याप्रकरणी, सहा जणांवर गुन्हा दाखल
By रूपेश हेळवे | Updated: June 18, 2023 15:28 IST2023-06-18T15:27:52+5:302023-06-18T15:28:22+5:30
निवडलेल्या पॅकेज मधील ठरलेल्या रकमेपेक्षाही ८० हजार रुपये आरोपींनी जादा घेतले.

पर्यटनाच्या पॅकेजपेक्षा अधिक रक्कम घेतल्याप्रकरणी, सहा जणांवर गुन्हा दाखल
सोलापूर : निवडलेल्या पर्यटनाच्या पॅकेज पेक्षा जास्त रक्कम घेऊन ८० हजाराला फसवल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत वीरेश शिवलिंगप्पा अंगडी (वय ४९, रा. उत्तर कसबा कुंभारवाडा) यांनी सदर बाझार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी यांनी आरोपींकडून पर्यटनासाठी पॅकेज घेतले होत. त्यांनी
निवडलेल्या पॅकेज मधील ठरलेल्या रकमेपेक्षाही ८० हजार रुपये आरोपींनी जादा घेतले. या प्रकरणी अंगडी यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना १२ फेब्रुवारी ते १७ जून २०२३ दरम्यान गुडवन हॉस्पीटॅलीटी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी येथे घडली. याप्रकरणी अमित यादव, करण काळे, प्रेम, आर्यन व यांच्यासह दोन जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास पोलीस नाईक माडे करीत आहेत.