दोन लाख रूपये लाचेची मागणी केल्याने बार्शीतील शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल

By Appasaheb.patil | Updated: August 14, 2023 19:26 IST2023-08-14T19:25:59+5:302023-08-14T19:26:03+5:30

शिक्षक सचिन उकिरडे याच्याविराेधात बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे

A case has been registered against a teacher in Barshi for demanding a bribe of two lakh rupees | दोन लाख रूपये लाचेची मागणी केल्याने बार्शीतील शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल

दोन लाख रूपये लाचेची मागणी केल्याने बार्शीतील शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल

सोलापूर : दोन लाख रूपये लाचेची मागणी केल्याने बार्शीतील शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लोकमत शी बोलताना सांगितले. सचिन प्रकाश उकिरडे (लोकसेवा विद्यालय, आगळगांव, ता. बार्शी) असे लाचेची मागणी करणारा शिक्षक आहे.

याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेली माहिती अशी की, सचिन उकिरडे याने विभागीय शिक्षण उपसंचालक, पुणे यांच्याशी तक्रारदार यांचे शिक्षक संघटनेशी संबंधित दोन शिक्षकांचे शालार्थ आयडीच्या अनुषंगाने बोलणे झाले. औदुंबर उकिरडे यांच्याकरिता म्हणून तक्रारदार यांचे शिक्षक संघटनेतील एका शिक्षकांचे शालार्थ आयडीचे केलेल्या कामाचा मोबदला व एका शिक्षकाचे शालार्थ आयडीचे काम करण्यासाठी म्हणून प्रत्येकी एक लाख रूपये असे दोन लाख रूपये लाचेची मागणी केली. 

कून लोकसेवक औदुंबर उकिरडे याच्यावर त्यांनी पदिय नात्याने आवश्यक असलेले काम करण्याबद्दल प्रभाव टाकण्याकरिता अयोग्यरित्या बेकायदेशीर परितोषण सवीकारण्याचा प्रयत्न केला असल्याने शिक्षक सचिन उकिरडे याच्याविराेधात बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक गणेश कुंभार याच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक उमाकांत महाडिक, पोलीस अंमलदार सायबण्णा कोळी, शिरीषकुमार सोनवणे, श्रीराम घुगे, रवि हाटखिळे, गायकवाड, शाम सुरवसे यांनी यशस्वीपणे बजाविली.

Web Title: A case has been registered against a teacher in Barshi for demanding a bribe of two lakh rupees