मरवडे आरोग्य केंद्रात ९५६ जणांना कोरोना लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:22 IST2021-04-07T04:22:55+5:302021-04-07T04:22:55+5:30
मरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात ९ मार्चपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणास सुरुवात झाली. ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना मोफत लसीकरण करण्यात येत ...

मरवडे आरोग्य केंद्रात ९५६ जणांना कोरोना लस
मरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात ९ मार्चपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणास सुरुवात झाली. ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना मोफत लसीकरण करण्यात येत आहे. लसीकरण केंद्रात नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय, विश्रांतीसाठी स्वतंत्र व्यवस्था, प्रशस्त हॉल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे या प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
या कामी तालुका आरोग्याधिकारी डॉ. नंदकुमार शिंदे व ज्येष्ठ वैद्यकीय डॉ. मलप्पा माळी यांच्या मार्गदर्शनाखाली समुदाय आरोग्याधिकारी गौरीशंकर बुगडे, महेश माळी, आनंद हत्तरसंग, सिद्राया बिराजदार, आरोग्य सहायक पांडुरंग कोळी, आरोग्य सहायिका राणी स्वामी, औषधनिर्माता हणमंत कलादगी, आरोग्यसेवक प्रवीणकुमार पवार, प्रमोदकुमार म्हमाणे, चंद्रकांत पवार, आरोग्यसेविका रूपाली तिऱ्हेकर, क्रांतिस्नेहल पाटील, सुधामती गंगणे, सीमा वाघमारे, उमा हुलवान, विद्याराणी स्वामी, धानेश्वरी हिरेमठ, वाहनचालक मोहन सरडे, लाडलेसो मुलाणी, आशा गटप्रवर्तक पूजा येडसे परिश्रम घेत आहेत.
---- ०६मंगळवेढा-मरवडे
मरवडे प्राथमिक केंद्रात लसीकरणप्रसंगी.