मंगळवेढ्यात ९ लाखांचा गुटखा जप्त
By Admin | Updated: July 5, 2014 00:09 IST2014-07-05T00:09:35+5:302014-07-05T00:09:35+5:30
९ लाख रुपये किमतीचा गुटखा साठा जप्त करण्यात आला आहे़

मंगळवेढ्यात ९ लाखांचा गुटखा जप्त
मंगळवेढा: कर्नाटकातून पंढरपूरकडे अवैध विक्रीसाठी चोरट्या मार्गाने नेला जात असलेला तब्बल ९ लाख रुपये किमतीचा गुटखा साठा जप्त करण्यात आला आहे़ अन्नसुरक्षा अधिकारी आणि तालुका पोलिसांच्या संयुक्त पथकाने शुक्रवारी सकाळी पाटखळ-आंधळगाव मार्गावर ही धडक कारवाई केली़ या प्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे़
कर्नाटकातून पंढरपुरात विक्रीसाठी गुटखा आणला जात असल्याची खबर मिळाल्यानंतर पोलीस आणि अन्न व औषधी प्रशासनाच्या संयुक्त पथकाने शुक्रवारी सकाळी प्रथम बोराळे नाका आणि नंतर पाटखळ-आंधळगाव मार्गावर सापळा रचला़ एमएच १३/ एएन ९१३२ या क्रमांकाचा टेम्पो आल्यानंतर पथकाने क्षणाचाही विलंब न करता छापा टाकला़ या टेम्पोतील तब्बल ८ लाख ३५ हजारांचा अवैध गुटखा जप्त करण्यात आला़ या प्रकरणी गजानन ज्ञानेश्वर लाड (वय २८), प्रमोद वैजिनाथ गायकवाड (वय ३३), गणेश विलास पंडित (वय २७, सर्व रा़ पंढरपूर) यांना अटक करण्यात आली आहे़