शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्ह्यातील बचत गटांसाठी ८.७६ कोटी खेळते भांडवल, राजेंद्र भारुड यांची माहिती, महिला स्वयंसहायता गटाच्या उत्पादनांचे प्रदर्शन सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 12:37 IST

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या वतीने जिल्ह्यात  १२ हजार ३३६ महिला बचत गट तयार केले आहेत. त्या गटांसाठी शासनाने ८ कोटी ७६ लाख रुपयांचे खेळते भागभांडवल उपलब्ध करून दिले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिली.

ठळक मुद्देजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या वतीने महिला स्वयंसहायता गटाने तयार केलेल्या विविध उत्पादनांचे प्रदर्शन‘रुक्मिणी जत्रे’चे महिला व बालकल्याण समितीच्या सभापती रजनी देशमुख यांच्या हस्ते होम मैदानावर उद्घाटन महिला बचत गटांनी तयार केलेल्या विविध वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. त्या स्टॉलची पाहणी पदाधिकारी व अधिकाºयांनी केली

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १४ : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या वतीने जिल्ह्यात  १२ हजार ३३६ महिला बचत गट तयार केले आहेत. त्या गटांसाठी शासनाने ८ कोटी ७६ लाख रुपयांचे खेळते भागभांडवल उपलब्ध करून दिले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी मंगळवारी येथील कार्यक्रमात दिली.जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या वतीने महिला स्वयंसहायता गटाने तयार केलेल्या विविध उत्पादनांचे प्रदर्शन ‘रुक्मिणी जत्रे’चे मंगळवारी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती रजनी देशमुख यांच्या हस्ते होम मैदानावर उद्घाटन झाले. त्यावेळी उपस्थित महिलांना उद्देशून डॉ. भारुड बोलत होते. यावेळी कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती मल्लिकार्जुन पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य नितीन नकाते, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अनिलकुमार नवाळे, नाबार्डचे प्रदीप झिले, लीड बँकेचे श्रीराम, त्रिवेणी भोंदे उपस्थित होते. या प्रदर्शनासाठी ३० स्टॉल्स उभारले आहेत. त्यामध्ये महिला बचत गटांनी तयार केलेल्या विविध वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. त्या स्टॉलची पाहणी पदाधिकारी व अधिकाºयांनी केली.सभापती देशमुख म्हणाल्या, आजची स्त्री निर्भीड झाली आहे. ती स्वत:च्या पायावर उभी राहिली आहे. शासनाच्या विविध योजना ‘उमेदह्णच्या माध्यमातून ग्रामीण भागातील स्त्रियांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले.सभापती पाटील यांनी भाषणातून ग्रामीण भागातील महिलांनी जिद्द व चिकाटी सोडू नये. जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व सरकार आपल्या पाठीशी ठामपणे उभे आहे, असा दिलासा उपस्थितांना दिला. महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तू आॅनलाईनच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे, असे नवाळे यांनी स्पष्ट केले. यावेळी राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्काराचे वितरणही करण्यात आले.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषद