सायकल मॅरेथॉनमध्ये ८५० जणांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:48 IST2021-02-05T06:48:12+5:302021-02-05T06:48:12+5:30
लायन्स क्लब बार्शी टाऊन, इनरव्हील क्लब बार्शी, रोटरी क्लब बार्शी, बार्शी सायकलिंग क्लब, निर्भया पथक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ...

सायकल मॅरेथॉनमध्ये ८५० जणांचा सहभाग
लायन्स क्लब बार्शी टाऊन, इनरव्हील क्लब बार्शी, रोटरी क्लब बार्शी, बार्शी सायकलिंग क्लब, निर्भया पथक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सायकल मरेथॉनमध्ये ८५० जणांनी सहभाग नोंदवला.
ही सायकल मॅरेथॉन ४ कि. मी. आणि १६ कि. मी. अशा दोन गटांत घेऊन यात ६ ते ६५ वयोगटातील साडे आठशे जणांनी सहभाग नोंदविला. याचा शुभारंभ शिवाजी महाविद्यालय येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून करण्यात आला. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष आसिफ तांबोळी होते. यावेळी शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, सचिव बापू शितोळे, अभिजीत जोशी, लायन्सचे रवी प्रकाश बजाज उपस्थित होते.
समारोपावेळी सहभागी झालेल्यांना बार्शी नगरपालिकेच्या माजी वसुंधरा अभियानांतर्गत वसुंधरा रक्षणाची शपथ दिली. सहभागी झालेल्यांना मेडल व प्रमाणपत्र देण्यात आले. लायन अमित इंगोले, द्वारकेश डोईफोडे, अभिजीत तांबारे, हेमा कांकरिया, बार्शी सायकल क्लबचे बाप्पा बारबोले, पद्माकर कात्रे, लायन्सचे अध्यक्ष उमेश चाैहान आदींनी उपक्रम यशस्वी केला. सूत्रसंचालन गौरी रसाळ यांनी केले तर आभार प्रदर्शन इनरव्हील सचिवा गुंजन जैन यांनी केले.