शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
भयानक धाडस...! प्रेक्षकांनी छेडछाड केली, प्रसिद्ध गायिकेने भर कार्यक्रमात स्वत:चे कपडे उतरविले; Video व्हायरल...
3
आता ₹३०,००० सॅलरी असेल तरी नो टेन्शन; EPF तुम्हाला बनवेल २ कोटींचा मालक, पाहा कॅलक्युलेशन
4
भारतावर २५ टक्के टॅरिफ, अमेरिकेचा धक्कादायक निर्णय; 'ट्रम्प'नितीमुळे कोणत्या वस्तू महागणार?
5
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
6
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
7
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
8
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
9
'व्हायरल गर्ल' मनीषाला नवऱ्यानेच लावला चुना; लग्नाच्या अवघ्या १० दिवसांत केलं कांड
10
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
11
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
12
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
13
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
14
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
15
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
16
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
17
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
18
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
19
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
20
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र

सोलापूर परिवहनचे ८२ कोटी तर शिक्षण मंडळाचे ३६ कोटींचे बजेट मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 12:51 IST

सोलापूर : महापालिका परिवहन समितीने मांडलेल्या अंदाजपत्रकात २ कोटींनी वाढ करून सभागृहाने ८२ कोटी ४२ लाखांचे शिलकी अंदाजपत्रक मंगळवारी महापालिकेच्या सभेत एकमताने मंजूर केले. त्याचबरोबर महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळ व बिगर प्राथमिक शिक्षण मंडळात प्रशासनाने सुचविलेल्या अंदाजामध्ये दोन कोटींनी वाढ करून ३६ कोटी ७५ लाखांचे अंदाजपत्रक एकमताने मंजूर करण्यात आले. महापौर ...

ठळक मुद्देमहापौर शोभा बनशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेची अर्थसंकल्पीय सभाशिक्षण मंडळाचे अंदाजपत्रक चर्चेविना मंजूर

सोलापूर : महापालिका परिवहन समितीने मांडलेल्या अंदाजपत्रकात २ कोटींनी वाढ करून सभागृहाने ८२ कोटी ४२ लाखांचे शिलकी अंदाजपत्रक मंगळवारी महापालिकेच्या सभेत एकमताने मंजूर केले. त्याचबरोबर महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळ व बिगर प्राथमिक शिक्षण मंडळात प्रशासनाने सुचविलेल्या अंदाजामध्ये दोन कोटींनी वाढ करून ३६ कोटी ७५ लाखांचे अंदाजपत्रक एकमताने मंजूर करण्यात आले. 

महापौर शोभा बनशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेची अर्थसंकल्पीय सभा झाली. या सभेत महापालिकेचे अंदाजपत्रक मंजूर झाल्यानंतर परिवहन समितीचे सभापती तुकाराम मस्के यांनी ८० कोटी ४२ लाख ५१ हजार ६०६ रुपयांचे अंदाजपत्रक सभेत सादर केले. यानंतर सभागृहनेते संजय कोळी यांनी सूचनेत परिवहन समितीने सुचविलेल्या अंदाजात वाढ सुचवत ८२ कोटींचे अंदाजपत्रक मांडले.

याचबरोबर उत्पन्नवाढीसाठी कर्मचाºयांना नवीन बसचे ज्ञान द्यावे, बसची संख्या वाढवून चांगली सेवा द्यावी. शासनाकडून व्यवस्थापक मिळविण्यासाठी १०० मार्ग असणे आवश्यक आहेत, परिवहनकडे ९६ मार्ग आहेत, आणखी मार्ग वाढविण्याचे प्रयत्न व्हावेत, अशा सूचना केल्या. विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी दर बसमागे ५ ते ७ कर्मचाराी असावेत, पण परिवहनकडे २० कर्मचारी आहेत. ही संख्या घटवून चांगले नियोजन करण्यासाठी व्यवस्थापक नियुक्त करावा, अशी मागणी केली. 

आयुक्तांनी पाठविलेल्या बिगर प्राथमिक शिक्षण मंडळाची सूचना सभागृहनेते संजय कोळी यांनी मांडली. प्राथमिक शिक्षण मंडळाच्या प्रशासनाने ३२ कोटी ७५ लाख १० हजारांचे अंदाजपत्रक सादर केले आहे. यात काहीच बदल केलेला नाही. बिगर प्राथमिक शिक्षण खात्याच्या अंदाजपत्रकात प्रशासनाने सुचविलेल्या क्रीडा महोत्सवाच्या खर्चात १ ऐवजी ४ लाखांची तरतूद मान्य केली. चर्चेविनाच पाच मिनिटात परिवहन व शिक्षण मंडळाचे बजेट एकमताने मंजूर करण्यात आले.

चर्चेविना अंदाजपत्रक मंजूर- परिवहन समिती व प्राथमिक शिक्षण मंडळाचे अंदाजपत्रक चर्चेविना मंजूर करण्यात आले.- महापालिकेच्या अंदाजपत्रकावर उमरखान बेरीया, आनंद चंदनशिवे, किसन जाधव, देवेंद्र कोठे, महेश कोठे, चेतन नरोटे, नागेश वल्याळ, नारायण बनसोडे, सुनीता रोटे, कामिनी आडम, श्रीदेवी फुलारे, गणेश पुजारी, गुरुशांत धुत्तरगावकर, ज्योती बमगुंडे, रियाज खैरादी, तौफीक शेख, राजकुमार हंचाटे यांची भाषणे झाली.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका