दिवाळी- छठ साठी पुणे आणि दानापूर दरम्यान ८ सुपरफास्ट स्पेशल
By रूपेश हेळवे | Updated: November 11, 2023 13:05 IST2023-11-11T13:05:10+5:302023-11-11T13:05:20+5:30
प्रवाशांच्या सोईसाठी रेल्वेकडून विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत.

दिवाळी- छठ साठी पुणे आणि दानापूर दरम्यान ८ सुपरफास्ट स्पेशल
सोलापूर : प्रवाशांच्या सोईसाठी रेल्वेकडून विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. मध्य रेल्वे पुणे आणि दानापूर दरम्यान दिवाळी, छठ पूजेसाठी ८ अतिरिक्त पूजा विषेश गाड्या चालवण्यात येणार आहे.
यात पुणे - दानापूर व्दि-साप्ताहिक अतिजलद विशेष ४ फेऱ्या होणार असून ही विशेष गाडी सोमवार आणि गुरुवारी पुणे येथून ६.३० वाजता निघेल. १३ आणि १६ नोव्हेंबर रोजी सुटेल आणि दानापूर येथे दुसऱ्या दिवशी ११.४० वाजता पोहोचेल. दानापूर - पुणे द्वि-साप्ताहिक अतिजलद विशेष गाडी १४ आणि १७ रोजी म्हणजे मंगळवार आणि शुक्रवारी विशेष गाडी दानापूर येथून दुपारी १.३० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी ७.४५ वाजता पोहोचेल.
या गाडीला हडपसर, दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खांडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाल उपाध्याय जं. बक्सर आणि आरा येथे थांबा देण्यात आले आहेत. या गाडीत संरचना २० डब्बे असून ६ तृतीय वातानुकूलित, १२ इकॉनॉमी तृतीय वातानुकूलित, एक लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर कार असे असणार आहे. या शिवाय पुणे - दानापूर अतीजलद गाडी १८ आणि २५ नोव्हेंबर रोजी पुणे येथून ६.३५ वाजता सुटेल आणि दानापूर येथे दुसऱ्या दिवशी ११.४० वाजता पोहोचेल. दानापूर - पुणे येथे १९ आणि २६ रोजी निघेल. दानापूर येथून १३.३० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी ७.४० वाजता पोहचेल.