सोलापूरात दोन गावठी पिस्तूलसह आठ जिवंत काडतुसे जप्त
By Admin | Updated: February 19, 2017 18:54 IST2017-02-19T18:54:34+5:302017-02-19T18:54:34+5:30
सोलापूरात दोन गावठी पिस्तूलसह आठ जिवंत काडतुसे जप्त

सोलापूरात दोन गावठी पिस्तूलसह आठ जिवंत काडतुसे जप्त
सोलापूरात दोन गावठी पिस्तूलसह आठ जिवंत काडतुसे जप्त
सोलापूर: बेकायदेशीर पिस्तूल बाळगल्याबद्दल दोन आरोपीला अटक करून त्याच्याकडून दोन पिस्तूल आणि आठ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.
जाकीरहुसेन अब्दुल सत्तार पिरजादे (वय २७,रा, होटगीव), जयेंद्र ऊर्फ शाहाजी शिवकांत पवार (वय ३४,रा, सुभाष नगर, मिरज, जि, सांगली) अशी अटक केलेल्या आरोपींचे नाव आहे.
गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब शिंदे व दत्तात्रय कोळे यांचे पथक महानगर पालिका निवडणुकीत अवैध धंदे व शस्त्रांची माहिती घेत होते.यावेळी आरोपी पिरजादे हा गावठी पिस्तुल व काडतुसे विकण्यासाठी कुमठे गावाजवळ जाणार असल्याची माहिती मिळाली होती.
त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने त्या दोघांना ताब्यात चौकशी केली असता, त्याच्याकडील दोन गावठी बनावटीचे पिस्तुल व आठ जिवंत काडतुसे, एक लोखंडी कुकरी (हत्यार) असा एकूण १ लाख ९०० रुपयांचा ऐवज जप्त केला.आरोपीविरुध्द विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सदर आरोपीविरुध्द दहशत माजविणे असे गुन्हे दाखल आहेत.
ही कामगिरी पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर, पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले, सहा. पोलीस आयुक्त शर्मिष्ठा वालावलकर, गुन्हेशाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुर्यकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब शिंदे, सपोनि दत्तात्रय कोळेकर, पोहेकॉ. दगडु राठोड, संजय बायस, अनिल वळसंगे, जयंत चवरे, पोलीस नाईक राकेश पाटील, आप्पासाहेब पवार, सुभाष पवार, जयसिंग भोई, मुन्ना शेख, पोकॉ. वसंत माने, किशोर तुक्कुवाले, रफीक इनामदार, लक्ष्मीकांत फुटाणे, धनजंय बाबर, सुदर्शन गवळी,गणेश शिर्के आदींनी ही कामगिरी केली.