जिल्ह्यात ७४ संवेदनशील मतदान केंद्र; १५२ ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान
By बाळकृष्ण दोड्डी | Updated: October 31, 2023 18:03 IST2023-10-31T18:03:25+5:302023-10-31T18:03:32+5:30
सर्वाधिक संवेदनशील मतदान केंद्रे मंगळवेढा आणि माळशिरस तालुक्यात आहेत.

जिल्ह्यात ७४ संवेदनशील मतदान केंद्र; १५२ ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान
सोलापूर : जिल्ह्यातील १०९ ग्रामपंचायत मध्ये सार्वत्रिक तसेच ४३ ग्रामपंचायत मध्ये पोटनिवडणूक लागली असून रविवारी, ५ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. यासाठी ४८३ मतदान केंद्रांची नियुक्ती करण्यात आली असून या पैकी संवेदनशील ७४ मतदान केंद्रांवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त असणार आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
सर्वाधिक संवेदनशील मतदान केंद्रे मंगळवेढा आणि माळशिरस तालुक्यात आहेत. मंगळवेढा तालुक्यात २४ केंद्र तर माळशिरस मध्ये २२ संवेदनशील मतदान केंद्र आहेत. पंढरपूर आणि माढा मध्ये प्रत्येकी ८ केंद्र, मोहोळ मध्ये ४ तसेच बार्शी तालुक्यात ३ संवेदनशील मतदान केंद्र आहेत. ४८३ मतदान केंद्रांवर ५७८ मतदान केंद्राध्यक्षाची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच २ हजार ३१२ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.