शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

सोलापूरातील ७० गृहनिर्माण संस्थांकडून शर्तभंग, कारवाई करण्यासाठी नोटीसा बजाविणार : जिल्हाधिकारी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2018 1:20 PM

सोलापूर शहर व जिल्ह्यातील  ७०  गृहनिर्माण संस्थांनी शासनाच्या नियमांची पायमल्ली करुन शर्तभंग केल्याची माहिती महसूल विभागाने केलेल्या तपासणीमध्ये आढळून आली आहे. यामध्ये जवळपास अडीच हजार शर्तभंग झाल्याची प्रकरणे असून, सहा हजार सभासदांचा समावेश आहे.

ठळक मुद्देशहर व जिल्ह्यातील  ७०  गृहनिर्माण संस्थांनी शासनाच्या नियमांची पायमल्ली करुन शर्तभंग केल्याची माहिती महसूल विभागाने केलेल्या तपासणीमध्ये आढळून आलीजवळपास अडीच हजार शर्तभंग झाल्याची प्रकरणेज्या गृहनिर्माण संस्थांनी नियमांची पायमल्ली करुन शासनाचा कर बुडवलाया सर्वांवर कारवाईच्या नोटिसा बजावण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २ : सोलापूर शहर व जिल्ह्यातील  ७०  गृहनिर्माण संस्थांनी शासनाच्या नियमांची पायमल्ली करुन शर्तभंग केल्याची माहिती महसूल विभागाने केलेल्या तपासणीमध्ये आढळून आली आहे. यामध्ये जवळपास अडीच हजार शर्तभंग झाल्याची प्रकरणे असून, सहा हजार सभासदांचा समावेश आहे. या सर्वांवर कारवाईच्या नोटिसा बजावण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली.शहरामध्ये गृहनिर्माण संस्थांचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरलेले आहे. संस्था नोंदणीकृत करताना शासनाने ठरवून दिलेले निकष पाळण्याचे बंधन घालण्यात आलेले आहे. मात्र अनेक संस्थांनी कालांतराने हे निकष मोडल्याची माहिती समोर आली आहे. महसूल विभागाने यासंबंधी घेतलेल्या आढाव्यामध्ये ही माहिती उपलब्ध झाली असून, ही संख्या ७० च्या घरात आहे. अनेक संस्थांचे चेअरमन, सभासद, पदाधिकाºयांनी स्वत:साठी जागा वापरणे, मोकळे प्लॉट ठेवणे, परस्पर प्लॉटची विक्री करणे, अधिक जागा अधिगृहित करणे अशी जवळपास २५०० प्रकरणे आहेत. प्रशासनाने अशा प्रकरणांवर कारवाई करण्याचे धोरण अवलंबले आहे. संबंधितांनी अशी कारवाई टाळण्यासाठी महसूल विभागाकडे संपर्क साधून ज्या प्रकाराची शर्तभंग केली आहे त्याच्या शासकीय नियमानुसार दंड भरुन नियमित करण्याची संधी उपलब्ध करण्यात आली आहे. वेळीच याचा लाभ                     घ्यावा अन्यथा कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात येणार आहेत. वेळीच या संधीचा लाभ घ्यावा, असे जिल्हाधिकाºयांनी स्पष्ट केले. गृहनिर्माण संस्थांच्या बाबतीत अनेक सभासदांच्याही शर्तभंगाबद्दल तक्रारी आहेत. महसूल विभागाकडून उक्त सर्व बाबी विचारात घेऊन अहवाल तयार केलेला आहे. संबंधितांनी प्रशासनाकडे संपर्क साधून शासकीय नियमान्वये अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा निपटारा करुन घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.बेकायदेशीर वाळू उपशासंदर्भात कारवाईसाठी अपर जिल्हाधिकाºयांकडे जबाबदारी आहे. संबंधितांवर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. यात कोणाची गय केली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. ---------------...तर मालमत्ता सरकारजमा करणारज्या गृहनिर्माण संस्थांनी नियमांची पायमल्ली करुन शासनाचा कर बुडवला आहे, त्यांना आवश्यक तो दंड भरुन संबंधित मालमत्ता नियमित करण्यासाठी शासनाकडून ही संधी उपलब्ध केली आहे. निर्धारित वेळेत त्याचा लाभ उठवला नाही तर संबंधित मालमत्ता सरकारजमा करण्यात येणार आहे. संबंधित दंड वा कराच्या रकमेमध्ये कोणताही कमी-जास्त बदल होणार नाही याची दखल घ्यावी, अशी इशारावजा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय