शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

६६ टनांचे गर्डर ४ तास २० मिनिटात उभारले; दोन महिन्यात होणार मजरेवाडीचा रेल्वे पूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 14:36 IST

आप्पासाहेब पाटील सोलापूर : ‘अ‍ॅन मॅन गेट’ योजनेंतर्गत मध्य रेल्वेने पूल उभारणीचे काम मागील वर्षभरापूर्वी हाती घेतले होते़ आतापर्यंत ...

ठळक मुद्दे‘अ‍ॅन मॅन गेट’ योजनेंतर्गत मध्य रेल्वेने पूल उभारणीचे कामआतापर्यंत सोलापूर ते दुधनी मार्गावर १८ पैकी १६ गेटचे काम पूर्ण मजरेवाडी-आसरा पुलाचे काम युध्दपातळीवर हाती घेण्यात आले

आप्पासाहेब पाटील

सोलापूर : ‘अ‍ॅन मॅन गेट’ योजनेंतर्गत मध्य रेल्वेने पूल उभारणीचे काम मागील वर्षभरापूर्वी हाती घेतले होते़ आतापर्यंत सोलापूर ते दुधनी मार्गावर १८ पैकी १६ गेटचे काम पूर्ण झाले आहे़ राहिलेल्या मजरेवाडी-आसरा पुलाचे काम युध्दपातळीवर हाती घेण्यात आले असून गुरूवारी या कामाला शुभारंभ झाला़ दुपारी १२ वाजून ४० मिनिटांनी सुरू करण्यात आलेले काम सायंकाळी ५ वाजता संपले़ ६६ टन वजन असलेले गर्डर बसविण्याचे काम ४ तास २० मिनिटांत उरकले़ येत्या दोन महिन्यात मजरेवाडीचा पूल नव्याने उभारला जाणार असून आसरा-मजरेवाडी दरम्यानची वाहतूक सुरळीत होणार आहे.

वर्षभरापूर्वी सोलापूर-दुधनी मार्गावर गेट काढून पूल उभारणी करण्याचे काम सुरू झाले़ मागील वर्षी टिकेकरवाडीजवळील पुलाची उभारणी करून कुमठे मार्गावरची वाहतूक सुरळीत केली़ त्यानंतर मजरेवाडीचे काम हाती घेण्यात आले़ आसरा पुलावरून दक्षिण सोलापूर व उत्तर सोलापूरमधील होणाºया उसाची वाहतूक छोट्या गेटमुळे अडून राहायची़ परिणाम: वाहतूक ठप्प होत होती़ तसेच दुचाकी, चारचाकी आणि किरकोळ प्रवासी वाहतूक खोळंबली जात होती़ याचा फटका विद्यार्थी, नोकरदार, मजूर आणि काही कारखानदारांना बसत होता़ काही दिवसांपूर्वी नगरसेविका मनीषा हुच्चे यांनी या पुलासंदर्भात रेल्वे प्रशासनाकडे काही सूचना केल्या होत्या़ त्यानुसार या कामाला गुरूवारी मुहूर्त मिळाला़ रेल्वे प्रशासनाचे पथक सकाळी दहा वाजता घटनास्थळी दाखल झाले़ दुपारी १२ वाजून ४० मिनिटांनी या कामास प्रारंभ झाला़ या पुलाच्या कामावेळी रेल्वे अधिकारी यांच्यासह बिल्डर असोसिएशनचे उपाध्यक्ष अमर बिराजदार, हणमंत कुलकर्णी आदी उपस्थित होते.

८ तास वीजपुरवठा खंडित- सोलापूर-टिकेकरवाडीदरम्यान रेल्वे पुलाच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात आला होता़ या रेल्वे रुळावरून गेलेल्या तारा तात्पुरत्या स्वरूपात काढण्यात आल्या होत्या़ पुलाच्या कामासाठी महावितरणच्या हत्तुरे विभागाकडून सकाळी ९ वाजता वीज बंद करण्यात आली होती़ दिवसभराच्या कामानंतर सायंकाळी ५ वाजता वीज पूर्ववत सुरू केली़ दिवसभरात ८ तास वीज बंद ठेवण्यात आली होती़ यामुळे कुमार नगर, जय प्लाझा, ताकमोगे वस्ती, समर्थ नगर, कल्याण नगर भाग १ आदी परिसरातील वीज गायब झाली होती़

या गाड्यांचा मार्ग बदलला/शॉर्ट टर्मिनेट केला

  • - बबलाद-कलबुर्गी रेल्वे स्टेशनदरम्यान पीएससी स्लॅबच्या पुनर्बांधणीकरिता ६ तास व सोलापूर -टिकेकरवाडी रेल्वे स्टेशनदरम्यानच्या उपमार्ग बांधकाम करण्याकरिता ४ तासांचा ट्रॉफिक ब्लॉक घेण्यात आला होता़ या दरम्यान मुंबई ते चेन्नई ही गाडी होटगी-गदग-गुंटकल, भुवनेश्वर ते मुंबई ही गाडी सिकंदराबाद-विकाराबाद-लातूर रोड-कुर्डूवाडी तर विशाखापट्टणम ते एलटीटी ही गाडी सिकंदराबाद-विकाराबाद-लातूर रोड-कुर्डूवाडीदरम्यान मार्ग बदलण्यात आला होता.
  • - याशिवाय सोलापूर-फलुकनामा पॅसेंजर ही गाडी गुरूवारी दुधनीपर्यंत व दुधनीहून फलुकनामा ही निर्धारित वेळेत धावली़ दुधनी ते कलबुर्गीदरम्यानची गाडी धावली नाही.
  • - रायचूर-बिजापूर ही गाडी कलबुर्गीपर्यंत धावली आणि कलबुर्गीहून सोलापूर-फलुकनामाप्रमाणे ही गाडी निर्धारित वेळेत धावली़ याचवेळी कलबुर्गी ते दुधनीदरम्यान रायचूर-बिजापूर ही गाडी धावली नाही़
  • - बिजापूर-रायचूर ही गाडी होटगीपर्यंत धावली़ होटगीहून ही गाडी होटगी ते रायचूरपर्यंत निर्धारित वेळेत धावली़ मात्र ही गाडी होटगी-सोलापूर-होटगीदरम्यान धावली नाही़
  • - म्हैसूर-सोलापूर ही गाडी गुरूवारी होटगीपर्यंत निर्धारित वेळेत धावली
  •  

या गाड्या उशिराने धावल्या़...- गाडी क्रमांक ५७६२८ कलबुर्गी ते सोलापूर आपल्या वेळेपेक्षा १ तास १० मिनिटे उशिरा धावली़ हीच गाडी कलबुर्गी स्थानकावरून संध्याकाळी ५़२० वाजता सुटली़- गाडी क्रमांक ११०२८ मद्रास मेल वाडी-कलबुर्गी स्थानकादरम्यानची गाडी १ तास ३५ मिनिटे उशिराने धावली़- गाडी क्रमांक १८५२० एलटीटी-विशाखापट्टणम सोलापूर-बबलाद स्थानकादरम्यान १ तास ४० मिनिटे उशिराने धावली़- गाडी क्रमांक १२०२६ सिकंदराबाद-पुणे शताब्दी एक्स्प्रेस ही गाडी वाडी-कलबुर्गी स्थानकादरम्यान २५ मिनिटे उशिराने धावली़ 

ट्रॅकमेंटेनर, मिस्त्री, हेल्पर तैनातसोलापूर-टिकेकरवाडीदरम्यान मजरेवाडी येथील गेट नं. ५७ च्या पुलाच्या कामासाठी २०० हून अधिक ट्रॅकमेंटेनर (गँगमन), मिस्त्री, हेल्पर आदी रेल्वे विभागातील अधिकारी, कर्मचारी तैनात करण्यात आले होते़ सकाळी १२ पासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत या अधिकारी, कर्मचाºयांनी यशस्वी भूमिका बजावली.

३ क्रेन, २ पोकलेन, ३ जेसीबी, ३ टिपर पुलाच्या कामासाठी गुरूवारी ब्लॉकच्या दिवसाच्या कामावेळी मजरेवाडी गेटजवळ ३ क्रेन, २ पोकलेन, ३ जेसीबी, ३ टिपर सज्ज ठेवण्यात आले होते़ यातील सर्वात मोठा क्रेन हैदराबादहून मागविण्यात आला होता काम करताना कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी जनरेटरची व्यवस्था करण्यात आली होती़ 

टॅग्स :Solapurसोलापूरrailwayरेल्वेSubhash Deshmukhसुभाष देशमुख