शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

सोलापूर जिल्ह्यासाठी आलेले कर्जमाफीचे ५७ कोटी बँकेकडे पडून !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2017 11:29 AM

कर्जदारांच्या यादीत चुका असलेल्या ८ हजार १४१ शेतकºयांच्या नावावर आलेली ५६ कोटी ५९ लाख ८६ हजार ६४२ रुपये इतकी रक्कम जिल्हा बँकेकडे पडून आहे.

ठळक मुद्देसोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्जदारांच्या यादीत चुकाशासनाने माहिती तंत्रज्ञान विभागात सुधारणा करुन ‘ग्रीन’याद्या पाठविण्यास सुरुवातचुका आढळल्याने कर्जमाफीचे काम थांबले

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ५ : कर्जदारांच्या यादीत चुका असलेल्या ८ हजार १४१ शेतकºयांच्या नावावर आलेली ५६ कोटी ५९ लाख ८६ हजार ६४२ रुपये इतकी रक्कम जिल्हा बँकेकडे पडून आहे. दुरुस्तीसाठी शेतकºयांच्या याद्या शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाकडे पाठविल्याचे सांगण्यात आले.सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या थकबाकीदार, नियमित कर्ज भरणारे व पुनर्गठन झालेल्या शेतकºयांच्या याद्या व रक्कम जिल्हा बँकेला येत आहे. सुरुवातीला याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर चुका आढळल्याने कर्जमाफीचे काम थांबले होते. शासनाने माहिती तंत्रज्ञान विभागात सुधारणा करुन ‘ग्रीन’याद्या पाठविण्यास सुरुवात केली आहे. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेला थकबाकीदार, नियमित कर्ज भरणारे व पुनर्गठन झालेल्या ३७ हजार ८३२ शेतकºयांच्या याद्या व सोबत  २०८ कोटी ७७ लाख १२ हजार ८९० रुपये जिल्हा बँकेला दिले  होते. शासनाने कर्जाची नियमित परतफेड करणाºया ५ हजार ९०७ शेतकºयांची यादी दिली होती, मात्र त्यांच्यासाठी आवश्यक ११ कोटी १४ लाख ८४ हजार १३४ रुपये इतकी प्रोत्साहनाची रक्कम मात्र दिलेली नाही.बँकेने थकबाकीदार व पुनर्गठनाची आलेली ग्रीन यादी तपासणी केली असता ८ हजार १४१ शेतकºयांच्या नावात, कर्ज रकमेत व अन्य चुका आढळल्या. या शेतकºयांची ५६ कोटी ५९ लाख ८६ हजार ६४२ रुपये इतकी रक्कम बँकेकडे पडून आहे. शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाकडून याद्यांमध्ये दुरुस्ती आल्यानंतर ही रक्कम शेतकºयांच्या खात्यावर जमा होणार असल्याचे बँकेकडून सांगण्यात आले. बँकेने आलेली रक्कम २९ हजार ६९१ पात्र शेतकºयांच्या खात्यावर १५२ कोटी ६७ हजार ४४ रुपये जमा केले आहेत.---------------------यापुढे आवश्यकतेच्या ५० टक्के रक्कम देणार - सोमवारी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीणसिंह परदेशी, सचिव दिनेशकुमार जैन व सहकार खात्याचे सचिव एस.एस. संधू यांनी साधला व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बँकांशी संवाद- राष्टÑीयीकृत बँकांचे आलेले पैसे शेतकºयांच्या खात्यावर जमा करण्याचे काम मागे- मुख्यमंत्र्यांच्या आढाव्यानंतरच पुढील रक्कम बँकांना देणार- आता नव्याने यादीसोबत यादीतील शेतकºयांना आवश्यक असलेल्यापैकी               ५० टक्के रक्कम बँकांना         देणार.- अगोदर दिलेल्या यादीतील अपात्र शेतकºयांची एकापेक्षा अनेक वेळा नावे असल्याने व अधिक रकमा आल्याने राज्यभरात बँकांकडे पैसे पडल्याने शासन करणार सुधारणा ़

टॅग्स :Solapurसोलापूरbankबँक