शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
2
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
3
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
4
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
5
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
6
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
7
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
8
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'
9
"आजवर तुम्ही चुकीचं नाव घेताय..", अखेर ईशा देओलने सांगितला तिच्या नावाचा खरा उच्चार
10
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
11
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
12
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
13
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
14
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
15
'हीरामंडी'च्या रोमँटिक गाण्यावर गौतमी पाटीलहीनेही दाखवली अदा, एका नजरेतच चाहते घायाळ
16
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
17
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
18
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
19
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
20
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले

सोलापूर शहरात ११ महिन्यात बेशिस्त चालकांकडून ५० लाखांचा दंड, २२ हजार ७३२ केसेस : उत्तर वाहतूक शाखेची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 12:50 PM

वाहतुकीचे नियम न पाळणे, सुसाट वेगाने वाहन चालविणे यासह सुरळीत वाहतुकीत अडथळा व ट्रिपल सीट जाणाºया अशा प्रकारच्या विविध २२ हजार ७३२ वाहनांवर उत्तर शहर वाहतूक शाखेने वर्षभरात कारवाई केली आहे.

ठळक मुद्देवाहनधारकांविरुद्ध शहर वाहतूक शाखेने १ जानेवारी ते ३० नोव्हेंबर २०१७ दरम्यान कारवाई मोहीम राबविली२२ हजार ७३२ वाहनांनी वाहतुकीचे नियम मोडल्याचे आढळून आल्याने वाहतूक कायद्यानुसार कारवाईशहरातील मुख्य बाजारपेठेत कुठेही पार्किंगची व्यवस्था नाहीमद्य प्राशन करून वाहन चालविणाºया १०६ चालकांवर कारवाई करुन १ लाख ६९ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल

अमीत सोमवंशी सोलापूर दि २६ : वाहतुकीचे नियम न पाळणे, सुसाट वेगाने वाहन चालविणे यासह सुरळीत वाहतुकीत अडथळा व ट्रिपल सीट जाणाºया अशा प्रकारच्या विविध २२ हजार ७३२ वाहनांवर उत्तर शहर वाहतूक शाखेने वर्षभरात कारवाई केली आहे. कारवाईपोटी आकारलेल्या दंडातून शासनाच्या तिजोरीत ४९ लाख २४ हजार ८५० रुपयांचा महसूल जमा केल्याचे पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांनी सांगितले.उत्तर शहरातील वाहतूक विस्कळीत होण्याचे प्रकार वाढले आहेत. बेशिस्त वाहतुकीला वठणीवर आणण्याचा प्रयत्न वाहतूक शाखेकडून होत असला तरीही वाहतुकीत काही प्रमाणात बेशिस्तच राहते. वाहनधारकांनी स्वत: वाहतुकीचे नियम पाळल्यास बेशिस्त वाहतूक बºयापैकी आटोक्यात येऊ शकते. नियमांना धाब्यावर बसविणाºया वाहनधारकांविरुद्ध शहर वाहतूक शाखेने १ जानेवारी ते ३० नोव्हेंबर २०१७ दरम्यान कारवाई मोहीम राबविली. यात एकूण २२ हजार ७३२ वाहनांनी वाहतुकीचे नियम मोडल्याचे आढळून आल्याने वाहतूक कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. त्यात ४९ लाख २४ हजार ८५० रुपयांचा दंड वसूल केला. अवैध प्रवासी वाहतूक, ट्रिपल सिट, रहदारीस अडथळा, मद्य सेवन करून वाहन चालविणे, फॅन्सी नंबरप्लेट, भरधाव वाहन चालविणे, रस्त्यावर हातगाडी, चारचाकी वाहने उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणे आदी कारणांवरून कारवाई करण्यात आली आहे़ मोबाईलवर बोलणे पडले महागातवाहन चालविताना मोबाईलवर बोलणे अतिशय धोकादायक आणि बेकायदेशीर असले तरी अनेक जण सर्रास हा प्रकार करीत असल्याचे शहरांमधील चित्र आहे. अनेकांनी मोबाईलवर बोलत वाहन चालविण्याची जीवघेणी कला अवगत केल्याचे दिसून येते. वाहन चालविताना मोबाईलवर बोलणाºया २ हजार २१८ जणांवर वाहतूक शाखेने कारवाई करुन ४ लाख ४३ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल केला. तसेच मद्य प्राशन करून वाहन चालविणाºया १०६ चालकांवर कारवाई करुन १ लाख ६९ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल केला.---------------------अशी झाली कारवाई...- गेल्या अकरा महिन्यात वाहतूक शाखेच्या वतीने वाहन चालकांजवळ लायसन्स नसणे, लायसन्स नसलेल्या इसमास वाहन चालवण्यास देणे, नो पार्किंग, नो एंट्री, लर्निंग लायसन्सचे एल बोर्ड नसणे, रिक्षाचे फ्रंट सीट, जीप फ्रंट सीट वाहनांचे कागदपत्र जवळ न बाळगणे, सीटबेल्टचा वापर न करणे, वाहनास नंबर प्लेट नसणे, नियमाप्रमाणे नंबर प्लेट नसणे, वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणे, ओव्हर लोड, गडद काचा, मालवाहू वाहनातून माणसे वाहून नेणे, नियमापेत्रा जास्त प्रवासी बसवणे, वाहनचालकास ड्रेस नसणे, वाहन कागदपत्रांचा अभाव, अवैध प्रवासी वाहतूक, आदेशाचे पालन न करणे, मद्यप्राशन करून वाहन चालवणे, रहदारीला अडथळा आदी विविध कायद्याखाली २२ हजार ७३२ कारवाई अंतर्गत ४९ लाख २४ हजार ८५0 इतका दंड वसूल करण्यात आला आहे. -----------------शहरात पार्किंगचा अभाव...- शहरातील मुख्य बाजारपेठेत कुठेही पार्किंगची व्यवस्था नाही. या मार्गावर मोठमोठे व्यापारी संकुले आहेत. परंतु पार्किंगची व्यवस्था नाही. येथे येणारे नागरिक आपली वाहने सुरक्षितपणे उभी ठेवण्यासाठी जागा नसल्याने रस्त्यावर ठेवतात. त्यानंतर अशा वाहनांवर वाहतूक पोलीस कारवाई करीत आहेत. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur City Policeसोलापूर शहर पोलीस