शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

पंढरीच्या स्वच्छतेसाठी ५ हजार ७८२ शौचालये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 13:26 IST

आषाढी यात्रेतील सोय : भाविकांचे आरोग्य सुरक्षित

ठळक मुद्देतीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून बांधलेल्या सुलभ शौचालयाच्या इमारतीमध्ये १२६ शौचालयाचे सीट, ११ ठिकाणी लघुशंका करण्याची सोयपत्राशेड परिसरात देखील तात्पुरत्या स्वरूपाची शौचालये उभारण्यात आली आहेतगजानन मठाच्या मागच्या बाजूला स्वच्छतागृह बांधले आहे. चंद्रभागा नदीच्या घाटाजवळील लाड मठासमोरही स्वच्छतागृहे बांधण्यात येत आहेत

सचिन कांबळे 

पंढरपूर : आषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी पंढरीत दाखल होणारे अनेक भाविक उघड्यावर शौचास जातात़ त्यामुळे जर तात्पुरत्या किंवा फिरत्या शौचालयाची सोय केली तर भाविक त्याचा लाभ घेऊ शकतील़ परिणामी शहर व परिसरात दुर्गंधी सुटणार नाही़ प्रशासनाने ५ हजार ७८२ शौचालये उपलब्ध करून दिली आहेत. त्यामुळे पंढरपूर शहर स्वच्छ राहण्यास मदत होणार आहे.

आषाढी, कार्तिकी, माघी, चैत्री या यात्रांमध्ये व महिन्याच्या एकादशीसाठी पंढरपुरात लाखो भाविक विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येतात. या भाविकांना योग्य ती सोय नसल्याने ते उघड्यावर शौचास बसतात. यामुळे स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर येतो. तसेच अनेकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता असते. यामुळे तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून शहराच्या विविध भागात शौचालय बांधणी केली आहे.

 दर्शनासाठी आलेले भाविक दर्शन रांगेत थांबतात. त्यामुळे सर्वाधिक गर्दी हिंदू स्मशानभूमीशेजारील पत्राशेड व तात्पुरत्या शेडमध्ये असते. यामुळे त्या ठिकाणी १२६ सीटची शौचालये बांधण्यात आली आहेत. त्याचबरोबर पत्राशेड परिसरात देखील तात्पुरत्या स्वरूपाची शौचालये उभारण्यात आली आहेत. तसेच भक्तिमार्ग परिसरात जादा मठांची संख्या आहे. यामुळे गजानन मठाच्या मागच्या बाजूला स्वच्छतागृह बांधले आहे. चंद्रभागा नदीच्या घाटाजवळील लाड मठासमोरही स्वच्छतागृहे बांधण्यात येत आहेत. तसेच चंद्रभागा नदीच्या घाटावरही तात्पुरत्या स्वरूपाची शौचालये उभारण्यात आली आहेत. 

अशा मिळणार सुविधा- तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून बांधलेल्या सुलभ शौचालयाच्या इमारतीमध्ये १२६ शौचालयाचे सीट, ११ ठिकाणी लघुशंका करण्याची सोय, २६ स्नानगृह, ३ क्लॉक रूम (साहित्य ठेवण्याची खोली), पार्किंग या सर्व इमारतीची देखभाल करणाºया लोकांसाठी १ खोली, पाणी साठवण्यासाठी १ लाख लिटरची भुयारी पाण्याची टाकी, २ मोटारपंप अशा सुविधा सुलभ शौचालयाच्या इमारतीत असल्याची माहिती सुलभ इंटरनॅशनल कंपनीचे आर. एन. झा यांनी दिली.

विभागनिहाय उभारणी- शहरात नगरपरिषदेचे २०९, सार्वजनिक बांधकाम विभागाचे १८६४, तात्पुरत्या स्वरूपाचे १५००, रेल्वे स्टेशन आणि अंबाबाई मंदिर पिछाडीस बंधाºयाच्यावर, विस्थापित नगर, कुंभार घाट या ठिकाणी फिरत्या शौचालयांची उभारणी करण्यात आली आहे़ 

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरPandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळाPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरPandharpur Wariपंढरपूर वारी