शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

पाच एकर क्षेत्रात घेतली २६ लाखांची केळी; दुबईच्या बाजारपेठेत पंढरपुरातील केळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 11:16 IST

तुंगतच्या शेतकºयाची यशोगाथा; तुंगतच्या शिवानंद रणदिवे यांची यशोगाथा

ठळक मुद्देशिवानंद रणदिवे असे त्या तरुण शेतकºयाचे नाव आहेशेतीची मशागत करून पाच एकरात पाच बाय सात अंतरावर केळी लागवडमोकळ्या शेतामध्ये केवळ सरी न सोडता ठिबक सिंचनद्वारे पाणीपुरवठा

अंबादास वायदंडे सुस्ते : पंढरपूर तालुक्यातील तुंगत येथील एका शेतकºयाच्या केळीने थेट दुबईची बाजारपेठ काबीज केली आहे. पाच एकरात २०० टन केळीचे उत्पन्न निघाले असून, त्यांना २१ लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. केवळ सरी न सोडता ड्रीपद्वारे पाणी देऊन बाग जतन करणाºया तरुण शेतकºयाची कहाणी आहे.

शिवानंद रणदिवे असे त्या तरुण शेतकºयाचे नाव आहे़ त्यांनी शेतीची मशागत करून पाच एकरात पाच बाय सात अंतरावर केळी लागवड केली़ मोकळ्या शेतामध्ये केवळ सरी न सोडता ठिबक सिंचनद्वारे पाणीपुरवठा केला़ गणेश या वाणाच्या ६ हजार ५०० इतक्या रोपांची त्यांनी १ मार्च २०१९ रोजी पाच एकर क्षेत्रावर लागवड केली.

ऐन उन्हाळ्यात पाणी मिळत नसल्याने केळीची रोपे सुकू लागली होती. परंतु रणदिवे यांनी जिद्द व चिकाटी सोडली नाही. त्यांनी प्रत्येक केळीच्या रोपाला घागरीने पाणी घालून बाग जतन केली. नेटके नियोजन आणि मशागत या  तत्त्वानुसार शेती फुलवली़ शिवानंद रणदिवे  यांची प्रगतिशील शेती पाहण्यासाठी नेहमीच आसपासच्या शेतकºयांची गर्दी असते. रणदिवे    यांनी तुंगत येथील सुनील अंद या युवकाच्या मदतीने केळीचा यशस्वी प्रयोग केला आहे.

लागवडीनंतर बायोटेकचे अमृत कीट, १९ : १९ : १९ हे केळी या पिकांची मुळी जास्त वाढावी, यासाठी देण्यात आले. महाधन २४ : २४, १८ : ४६ हे पाच एकरासाठी एकूण १२५ बॅगा देण्यात आल्या आहेत. आठ महिन्यांनंतर घड बाहेर पडल्यानंतर यारा कंपनीच्या मायक्रो न्यूट्रीशियनचा २ मि.ली.ने स्प्रे देण्यात आला. यानंतर निकनेल ३२, १३ : ० : ४५ यांचा स्प्रे देण्यात आला. 

दुबईला १९० टन केळीची निर्यात - योग्य व्यवस्थापनानंतर २ फेब्रुवारी २०२० रोजी पहिली तोड केली़. पंजाब येथील बाजारपेठेत १० टन केळी १२ रुपये ५० पैसे किलो दराने पाठविण्यात आली. कंदर (ता. करमाळा) येथील एका फ्रूट कंपनीच्या मदतीने तुंगतमधील केळी आता दुबई गाठत आहे. दुबईला १९० टन केळीची निर्यात होत असून, १३ रुपये प्रति किलो असा दर मिळत आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरीfruitsफळे