रहाटेवाडी पाणीपुरवठा योजनेसाठी ४९ लाखांचा निधी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:26 IST2021-08-21T04:26:43+5:302021-08-21T04:26:43+5:30
या योजनेतून उपलब्ध झालेल्या निधीतून पाणीपुरवठा विहीर, पाईपलाईन, उंच पाण्याची टाकी उभा करून घरोघरी नळ पुरवठा सुविधा करून देणे ...

रहाटेवाडी पाणीपुरवठा योजनेसाठी ४९ लाखांचा निधी मंजूर
या योजनेतून उपलब्ध झालेल्या निधीतून पाणीपुरवठा विहीर, पाईपलाईन, उंच पाण्याची टाकी उभा करून घरोघरी नळ पुरवठा सुविधा करून देणे अशी कामे केली जाणार आहेत. ही पाणीपुरवठा योजना मंजूर व्हावी यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी पाठपुरावा केला होता. जनतेची ही मागणी लक्षात घेऊन आ. समाधान आवताडे यांनी विशेष प्रयत्न करून हा निधी मिळवून दिला आहे.
यासाठी जि. प. उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, माजी सभापती शिला शिवशरण, जि. प. सदस्या मंजुळा कोळेकर, पंचायत समिती सभापती प्रेरणा मासाळ, उपसभापती सूर्यकांत ढोणे, माजी सभापती प्रदीप खांडेकर, माजी उपसभापती विमल पाटील, नवनाथ पवार, सरपंच वर्षाराणी पवार, उपसरपंच आश्विनी पवार, ग्रामविकास अधिकारी मुलाणी, आमदार कार्यालयाचे प्रशासन अधिकारी सुभाष ढेकळे-पाटील यांनी पाठपुरावा केला.