होटगी रोडवरील गॅरेज फोडून ४५ हजारांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:24 IST2020-12-06T04:24:27+5:302020-12-06T04:24:27+5:30

विनामास्क वावर; १८ हजार ८०० रुपयाचा दंड सोलापूर : शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत विनामास्क प्रवास करणाऱ्या वाहनचालकांवर ...

45,000 stolen from garage on Hotgi Road | होटगी रोडवरील गॅरेज फोडून ४५ हजारांची चोरी

होटगी रोडवरील गॅरेज फोडून ४५ हजारांची चोरी

विनामास्क वावर; १८ हजार ८०० रुपयाचा दंड

सोलापूर : शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत विनामास्क प्रवास करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात असून, आतापर्यंत १८ हजार ८०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. फौजदार चावडी पोलीस ठाणे, जेलरोड पोलीस ठाणे, सदर बाजार पोलीस ठाणे, विजापूर नाका पोलीस ठाणे, एमआयडीसी पोलीस ठाणे, जोडभावी पेठ पोलीस ठाणे या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये शनिवारी कारवाई करण्यात आली. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्कची सक्ती करण्यात आली आहे.

रक्तदात्यांना संविधान प्रत भेट

सोलापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रविवारी बुद्धराष्ट्र प्रतिष्ठानच्या वतीने न्यू बुधवार पेठ बस डेपोजवळ रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक रक्तदात्यास भारतीय संविधानाची प्रत भेट देण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थापक अजित गादेकर यांनी दिली. जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्त देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करावे, असे आवाहनही केले.

Web Title: 45,000 stolen from garage on Hotgi Road