पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी ४१३ कोटींची तरतूद; सार्वजनिक बांधकाम मंत्र्याची पंढरपुरात माहिती

By Appasaheb.patil | Published: February 9, 2024 05:58 PM2024-02-09T17:58:38+5:302024-02-09T17:59:01+5:30

पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत प्रगतीपथावर असलेल्या कामांचा आढावा शासकीय विश्रामगृह पंढरपूर येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण यांनी घेतला.

413 crore provision for Pandharpur Pilgrimage Development Scheme; Pandharpur information of Minister of Public Works | पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी ४१३ कोटींची तरतूद; सार्वजनिक बांधकाम मंत्र्याची पंढरपुरात माहिती

पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी ४१३ कोटींची तरतूद; सार्वजनिक बांधकाम मंत्र्याची पंढरपुरात माहिती

पंढरपूर : सुधारित आराखड्यामध्ये श्री क्षेत्र देहू, आळंदी, भंडारा डोंगर, नेवासा, पंढरपूर तसेच पालखी मार्ग व पालखी तळांवर  मूलभूत सुविधा देण्यासाठीच्या कामांचा समावेश केला आहे. अंतिम सुधारित आराखड्यामध्ये पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी ४१३ कोटी १३ लाखांची तरतूद करण्यात आली असून यातील पूर्ण झालेली कामे वगळता अन्य प्रस्तावित कामे तातडीने पूर्ण करावीत असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले.

पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत प्रगतीपथावर असलेल्या कामांचा आढावा शासकीय विश्रामगृह पंढरपूर येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण यांनी घेतला. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार समाधान आवताडे, आमदार सुभाष देशमुख,माजी आमदार प्रशांत परिचारक, उत्तम जानकर,अधिक्षक अभियंता संजय माळी, कार्यकारी अभियंता अमित निमकर, तसेच मान्यवर पदाधिकारी  उपस्थित होते.

Web Title: 413 crore provision for Pandharpur Pilgrimage Development Scheme; Pandharpur information of Minister of Public Works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.