शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

अपघाताचा बनाव करुन विक्री केलेली ४० लाखांची विदेशी दारु नगरमध्ये जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2022 15:07 IST

दोघांना अटक : राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

सोलापूर : करमाळा तालुक्यातील जातेगाव हद्दीत विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात घडवण्यापूर्वी विक्री केलेली ४० लाखाची दारू जप्त करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने ही कारवाई करण्यात आली असून, दोघांना अटक झाली आहे.

वाहन चालक जहीर रफिक अत्तार (वय ४९, रा. नाशिक), विष्णू मधुकर डमाळे (वय ४२, रा. इमामशाही कोळीवाडा, नाशिक) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. हा मद्यसाठा २३ फेब्रुवारी रोजी युनायटेड स्पिलीट लि., पारमोरी, ता. दिंडोरी, जि. नाशिक येथून अर्तानी ट्रेडर्ससाठी खरेदी करण्यात आला होता. हा विदेशी मद्यसाठा (क्र. एमएच १५ बीजे ३७३३) मधून करमाळामार्गे सोलापूरला येत होता. २५ फेब्रुवारी रोजी करमाळा तालुक्यातील जातेगाव हद्दीत मालट्रक पलटी करून अपघात घडवून आणला. अपघातानंतर घटनास्थळी एक हजारपैकी ३९८ बॉक्स व पाच बाटल्या सुस्थितीत होत्या. सात बॉक्स फुटलेल्या आवस्थेत आढळून आले. वाहनचालकाची चौकशी केली असता त्याने समाधानकारक उत्तर दिले नाही. संशय आल्याने त्याची कसून चौकशी करण्यात आली, तेव्हा त्याने ५९५ बॉक्स घोडेगाव (ता. नेवसा, जि. अहमदनगर) येथेे ठेवल्याची कबुली दिली.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी घोडेगाव येथे जाऊन तपासणी केली असता, दामू जाधव याच्या मालकीच्या पत्राशेडमध्ये ५२७ बॉक्स आढळून आले. ४० लाख ४७ हजार ३६० रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या नेतृत्त्वाखाली उपअधीक्षक आदित्य पवार, निरीक्षक मुळे, कदम, दुय्यम निरीक्षक अंकुश आवताडे, शंकर पाटील, एस. ए. पाटील, शेख, भरते, सहाय्यक दुय्यम निरीक्षक होळकर, मुंडे व जवान कर्मचारी लुंगसे, कर्चे, वडमिले, सावंत, वाहनचालक मिसाळ, वाघमारे, रशीद शेख यांनी पार पाडली.

फरार झालेल्या दोघांचा शोध सुरू

  • ० याप्रकरणी जहीर अत्तार व विष्णू डमाळे या दोघांना अटक करण्यात आली आहे. दोघांविरूद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रकमालक गुलाम महमंद अन्सारी (रा. नाशिक), दामू जाधव (रा. घोडेगाव) हे दोघे फरार झाले असून, त्यांचा शोध सुरू आहे.
  • ० अवैध दारू विक्री, निर्मिती, वाहतुकीवर सातत्याने कारवाया केल्या जात आहेत. असे प्रकार आढळल्यास नागरिकांनी संपर्क साधावा, असे आवाहन अधीक्षक नितीन धार्मिक यांनी केले आहे.

 

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारीExcise Departmentउत्पादन शुल्क विभाग