बार्शीत ३९ हजाराचा गुटखा पकडला; तरुणाविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:17 IST2021-06-25T04:17:10+5:302021-06-25T04:17:10+5:30

बार्शी : अन्न व प्रशासन विभागाच्या पथकाने गुरुवारी दुपारी १२ वाजेच्या दरम्यान गाडेगाव परिसरात एके ठिकाणी धाड टाकून ...

39,000 gutkha seized in Barshi; Crime against youth | बार्शीत ३९ हजाराचा गुटखा पकडला; तरुणाविरुद्ध गुन्हा

बार्शीत ३९ हजाराचा गुटखा पकडला; तरुणाविरुद्ध गुन्हा

बार्शी : अन्न व प्रशासन विभागाच्या पथकाने गुरुवारी दुपारी १२ वाजेच्या दरम्यान गाडेगाव परिसरात एके ठिकाणी धाड टाकून ३९ हजाराचे १८ बॉक्स गुटखा जप्त केला आहे.

याप्रकरणी दत्तात्रय हरी गाडे (३१, रा. गडेगाव रोड बार्शी) याच्याविरुद्ध सोलापूर अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी नसरीन मुजावर यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे.

पोलीस सूत्राकडील माहितीनुसार, सोलापूरच्या अन्न व प्रशासनास बार्शीत गुटखा साठा करण्यात आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी गाडेगाव परिसरात एके ठिकाणी धाड टाकली. दत्तात्रय गाडे याच्याकडून आरएमडी पानमसाला, सेंटेड तंबाखू १८ बॉक्स जप्त करून पोलिसांच्या ताब्यात दिले. जप्त मालातील काही नमुने घेऊन तपासणीला पोलिसांकडे जमा करण्यात आला.

----

Web Title: 39,000 gutkha seized in Barshi; Crime against youth