झेडपीच्या ३८८ प्राथमिक शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:28 IST2021-02-17T04:28:08+5:302021-02-17T04:28:08+5:30
यासाठी दीड वर्षापासून वरिष्ठ वेतनश्रेणी लाभ मंजूर व्हावा यासाठी जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीने पाठपुरावा करण्यात आला. मंगळवारी जिल्ह्ययातील ...

झेडपीच्या ३८८ प्राथमिक शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ
यासाठी दीड वर्षापासून वरिष्ठ वेतनश्रेणी लाभ मंजूर व्हावा यासाठी जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीने पाठपुरावा करण्यात आला.
मंगळवारी जिल्ह्ययातील ३८८ प्राथमिक शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ मंजूर झाल्याने सोलापूर जिल्हा जुनी पेन्शन हक्क संघटनेतर्फे सीईओ दिलीप स्वामी यांचे झेडपी अध्यक्ष सन्माननीय अनिरुद्ध कांबळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत, शिक्षणाधिकारी संजय राठोड यांचेही आभार मानण्यात आले.
यासाठी बार्शी तालुका जुनी पेन्शन हक्क संघटनेचे अध्यक्ष महेश जगताप, सरचिटणीस प्रविण देशमुख, सदस्य मोहन पवार, संदीप गायकवाड, अण्णा ठोकळ, अतुल खाडे, विश्वनाथ ढाणे, बंडू गोरे, गणेश पावले, यासीर पिरजादे, सुजीत जाधव, सूर्यकांत सरक, वासुदेव आडसूळ, संजय जाधवर, अशोक भडकवाड, विष्णू मिरगणे, महिला आघाडीच्या सुलभा काळे, शकुंतला पालके, परवीन तांबोळी, सीमा देशमुख, आश्विनी ढोबळे, दीपा गोरे, सारिका रोटे यांचे सहकार्य लाभले.