शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

सोलापूर महानगरपालिकेच्या डोक्यावर आजही ३७८ कोटींचं देणं; मक्तेदार, सेवानिवृत्त सेवकही हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 3:31 PM

राकेश कदम  सोलापूर : महापालिकेच्या परिवहन विभागाला वाचविण्यासाठी परिवहन समितीचे सभापती तुकाराम मस्के यांच्यासह शिवसेनेच्या सदस्यांनी मनपा आयुक्त डॉ. ...

ठळक मुद्देमहापालिकेची आर्थिक स्थिती अद्यापही नाजूककामांचे बिल द्यायचे कसे असा प्रश्न आजही महापालिकेकडे पुढे कायम गेल्या एक वर्षात मक्तेदारांना ४० कोटी रुपये देण्यात आले

राकेश कदम 

सोलापूर : महापालिकेच्या परिवहन विभागाला वाचविण्यासाठी परिवहन समितीचे सभापती तुकाराम मस्के यांच्यासह शिवसेनेच्या सदस्यांनी मनपा आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांच्यापुढे  झोळी पसरली आहे. पण महापालिकेपुढे केवळ परिवहन विभागाच नव्हे तर शहरातील मक्तेदार, पेन्शनधारक याचंही देणं आहे. या देण्याचा आकडा ३७८ कोटींवर पोहोचला आहे. 

परिवहन उपक्रमातील कर्मचाºयांना दोन महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. महापालिका प्रशासनाकडून परिवहनच्या दिव्यांग प्रवास निधीची ८३ लाख रुपयांची रक्कम थकीत आहे. ही थकीत रक्कम दिल्यास कर्मचाºयांचा पगार करता येईल, या मागणीसाठी परिवहन समितीचे सभापती तुकाराम मस्के यांच्यासह सदस्य मनपा आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांना भेटायला गेले होते. तेव्हा आयुक्तांना त्यांच्यासमोर भिकाºयाकडे भीक काय मागता, असे मत व्यक्त केले होते. 

महापालिकेची आर्थिक स्थिती अद्यापही नाजूक आहे. अडीच वर्षांपूर्वी तत्कालीन आयुक्त विजयकुमार काळम यांनी मनपा निवडणुकीच्या तोंडावर आर्थिक स्थिती न पाहता १५० कोटींहून अधिक कामांच्या वर्कआॅर्डर दिल्या. मक्तेदारांनी कामे केली. पण या कामांचे बिल द्यायचे कसे असा प्रश्न आजही महापालिकेकडे पुढे कायम आहे. मनपा आयुक्त डॉ. ढाकणे यांनी पदभार घेतल्यानंतर भांडवली कामांना मंजुरी देण्यास नकार दिला. प्रथम मागचं देणं देऊ. त्यानंतरच पुढील कामे करु, असे त्यांनी सांगितले आहे. गेल्या एक वर्षात मक्तेदारांना ४० कोटी रुपये देण्यात आले आहेत. अद्यापही १०१ कोटी रुपयांंची देणी कायम आहेत. मनपा सेवक आणि सेवानिवृत्त सेवकांच्या देण्याचा आकडा १२३ कोटी रुपये आहे.

उत्पन्न वाढीत अडथळे, जीएसटी अनुदानात तूट - महापालिकेचा मासिक खर्च २२ कोटी रुपये आहे. त्याप्रमाणात उत्पन्न मिळत नाही. महापालिकेच्या मिनी व मेजर गाळ्यांना रेडीरेकनरप्रमाणे भाडे आकारणी केल्यास  महापालिकेला ३० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळू शकते. पण गाळ्यांचा प्रश्नात नगरसेवक अडथळे आणत असल्याचे चित्र महापालिकेत पाहायला मिळत आहे. शासनाकडून जीएसटी अनुदानापोटी प्रतिमहिना १८ कोटी रुपये मिळणे अपेक्षित आहे, मात्र राज्य शासनाकडून केवळ १५ कोटी रुपये दिले जात आहेत. 

आठ महिन्यात ‘परिवहन’ला दिले ११ कोटी ५५ लाख : धनवे- मुख्य लेखाधिकारी शिरीष धनवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक अडचणीत असतानाही महापालिकेने परिवहन विभागाला वारंवार मदत केली आहे. एप्रिल २०१८ ते ७ जानेवारी २०१९ या आठ महिन्यांच्या काळात सेवकांची पेन्शन, दुरुस्तीची कामे, यासाठी १० कोटी १५ लाख रुपये देण्यात आले आहेत. महिला व बालकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाºया मुलींना मोफत प्रवास या योजनेतील १ कोटी ४० लाख रुपयांचे बिल अदा करण्यात आले आहे. 

महापालिकेने यापूर्वीही परिवहन उपक्रमाला मदत केलेली आहे. आजवर सर्वात जास्त मदत ही परिवहन विभागालाच झाली असेल. सध्या इतर देणीही देण्याचे काम सुरू आहे. मुळातच महापालिकेकडे पैसे नसल्याने परिवहनला मदत करणे अवघड आहे. - डॉ. अविनाश ढाकणे, आयुक्त, महापालिका. 

महापालिकेची देणी  

  • - मनपा सेवक व निवृत्त सेवकांची देणी - १२३ कोटी ६२ लाख
  • - प्राथमिक शिक्षण मंडळ सेवकांची देणी - २ कोटी 
  • - भूसंपादन, कोर्ट आस्थापना, नगर रचना आस्थापना खर्च - ८ कोटी
  • - विविध योजनेत मनपा हिस्सा भरावयाची रक्कम - ३७ कोटी 
  • - स्मार्ट सिटी मनपा हिस्सा - ८० कोटी
  • - शासकीय कर्जे देय रक्कम - २६ कोटी ५० लाख
  • - मक्तेदार देय रक्कम - १०१ कोटी 
  • - एकूण - ३७८ कोटी १२ लाख ७५ हजार 
टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका