शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

सिद्धेश्वर एक्स्प्रेस गाडीत ३६ मोबाईल चार्जिंग पॉर्इंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 10:59 IST

सोलापूर : रेल्वे मंत्रालयाच्या उत्कृष्ट प्रकल्पांतर्गत सोलापूर -मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सोलापूर या सिद्धेश्वर एक्स्प्रेस गाडीच्या डब्यांचे नूतनीकरण ...

ठळक मुद्देसिद्धेश्वर एक्स्प्रेसच्या १७ डब्यांचे नूतनीकरण करण्यात आले रेल्वे मंत्रालयाच्या वतीने रेल्वेतील डब्यांच्या नूतनीकरणासाठी विशेष प्रकल्पांतर्गत निधी मंजूररेल्वेत विविध बदल व नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले

सोलापूर : रेल्वे मंत्रालयाच्या उत्कृष्ट प्रकल्पांतर्गत सोलापूर-मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सोलापूर या सिद्धेश्वर एक्स्प्रेस गाडीच्या डब्यांचे नूतनीकरण करण्यात आल्याची माहिती रेल्वे विभागाने दिली़ आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईलचा वापर वाढलेला आहे़ या वाढत्या वापरामुळे प्रवाशांची मागणी लक्षात घेता रेल्वे  मंत्रालयाने प्रत्येक रेल्वे गाड्यात मोबाईल चार्जिंग पॉर्इंट वाढविण्याचा मानस केला आहे़ त्यानुसार सिद्धेश्वर एक्स्प्रेस या गाडीत ३६ मोबाईल चार्जिंग पॉर्इंट बसविण्यात आल्याची माहिती रेल्वे विभागाने दिली.

रेल्वे मंत्रालयाच्या वतीने रेल्वेतील डब्यांच्या नूतनीकरणासाठी विशेष प्रकल्पांतर्गत निधी मंजूर करण्यात आला होता़ त्यानुसार सिद्धेश्वर एक्स्प्रेसच्या १७ डब्यांचे नूतनीकरण करण्यात आले आहे.

यात नव्या टाईल्स, टॉयलेट पॅनल्स विनायील शीटने सुशोभित, ३६ मोबाईल चार्जिंग पॉर्इंट, पी़यु़ रंगाने रंगविले, वातानुकूलित डब्यात रंगीबेरंगी  पडदे, प्रत्येक डब्यात एरोसोल डिस्पेन्सर बसविण्यात आल्याची माहिती रेल्वे विभागाने दिली.

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी फायर बॉल्सची सुविधा- रेल्वेत होणाºया चोºया व गैरप्रकार रोखण्यासाठी रेल्वेच्या सुरक्षा विभागाकडून विविध उपाययोजना आखण्यात येत आहेत़ याचाच एक भाग म्हणून उत्कृष्ट प्रकल्पांतर्गत सिद्धेश्वर एक्स्प्रेसच्या नूतनीकरणात प्रवाशांच्या सुरक्षेसाठी फायर बॉल्सची सुविधा पुरविण्यात आली आहे़ याशिवाय जंतुविरहित सोप डिस्पेंन्सर, डिजिटल हायग्रो मीटर, अ‍ॅक्रेलिक मोबाईल होल्डर्स व नाईट ग्लो बर्थ इंडिकेटर्स या प्रकारच्या सोयी पुरविण्यात आल्या आहेत़ 

या नूतनीकरणामुळे सिद्धेश्वर एक्स्प्रेसच्या सौंदर्यात भर पडली आहे़ शिवाय विविध सेवासुविधा निर्माण केल्यामुळे स्वच्छता व्यवस्थित होणार आहे़ सोलापूर मंडलातील प्रवाशांसाठी ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे़ रेल्वेत विविध बदल व नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे़ याकामी प्रवाशांनी रेल्वे प्रशासनास सहकार्य करावे़- हितेंद्र मल्होत्रा, मंडल रेल प्रबंधक, सोलापूर मंडल

टॅग्स :Solapurसोलापूरrailwayरेल्वेcentral railwayमध्य रेल्वे