शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

श्राद्धाच्या जेवणातून हिरोळी गावातील ३५ जणांना विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 14:31 IST

सोलापुरातील १२ जणांसह अक्कलकोटमधील पाहुण्यांचा समावेश

ठळक मुद्देहिरोळी येथे कार्यक्रम झाल्यानंतर रात्री जेवण झाले, दुसºया दिवशी सर्व पाहुणे आपापल्या गावी निघून गेलेसोलापुरातील नातेवाईक सकाळी हिरोळी येथून निघाले, अन्न भरपूर राहिल्याने त्यांनी जेवण सोबत घेतलेजेवण गरम केल्यानंतर सर्वांनी पुन्हा सामूहिक जेवण केले. काही तासातच सर्वांना अचानक उलटी आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला

सोलापूर : गुलबर्गा जिल्ह्यातील आळंद तालुक्यात हिरोळी या गावी श्राद्धाच्या कार्यक्रमानंतर दुसºया दिवशी पाहुण्यांनी शिळे अन्न खाल्ल्याने सुमारे पस्तीस जणांना विषबाधा झाली. हा प्रकार शनिवारी व रविवारी घडला. 

रफिक अहमद लंगडे (वय २५), बेगम सिकंदर मुजावर (वय ६५), शाहीर सिकंदर मुजावर (वय २५), सादिक हुसेनबाशा मुजावर (वय १८), खैरून रफिक लंगडे (वय २३), सत्तार रजाक लंगडे (वय ३५), निलोफर अल्लाउद्दीन लंगडे (वय १४), लतिफ अहमद लंगडे (वय २२), मुस्ताक हुसेन मुजावर (वय १५), फारुख अन्वर पटेल (वय १५, सर्व रा. शोभादेवी नगर, सोलापूर) या रुग्णांना उपचारासाठी शनिवारी दुपारी २.१५ वाजता शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. अहमद मौलासाब लंगडे (वय ४७, रा. हिरोळी, ता. आळंद, जि. गुलबर्गा) यांना उपचारासाठी शेजारी राहणारे मौलाली मकानदार व हुसेन मुजावर यांनी शनिवारी दुपारी २.१५ वाजता तर काहींना रात्री १0.१५ वाजता सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. 

याच कार्यक्रमातील प्यारनबी हनीफ लंगडे (वय ६०), जिलानी हनीफ लंगडे (वय ४५), जुबेदा जिलानी लंगडे (वय ११), मुस्कान रज्जाक लंगडे (वय १५, सर्व रा. हिरोळी, ता. आळंद, जि. गुलबर्गा), चाँद घुडूभाई खडकाळे (वय ५२), सोहेल चाँद खडकाळे (वय ५0, सर्व रा. देशमुख बोरगांव, ता. अक्कलकोट) यांना गुलाब मुजावर व मुबारक खडकाळे यांनी रविवारी सकाळी ११.१५ वाजता दाखल केले आहे.सर्व मंडळी नातेवाईकाचा अंत्यविधी झाल्यानंतर चाळीसाव्या दिवशी होणाºया श्राद्धाच्या कार्यक्रमाला आळंद तालुक्यातील हिरोळी येथील घरी आले होते. १२ जुलै रोजी कार्यक्रम झाला, सर्व मंडळींचे जेवण झाले. दुसºया दिवशी सकाळी सोलापुरातील नातेवाईकांनी डब्यात अन्न घेतले व सोलापूरला आले. शोभादेवी नगरातील घरात सर्वांनी मिळून आणलेले शिळे अन्न गरम करून जेवण केले. काही तासातच सर्वांना उलटी आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. 

सर्व पाहुण्यांना एकसारखा त्रास- हिरोळी येथे कार्यक्रम झाल्यानंतर रात्री जेवण झाले. दुसºया दिवशी सर्व पाहुणे आपापल्या गावी निघून गेले. सोलापुरातील नातेवाईक सकाळी हिरोळी येथून निघाले, अन्न भरपूर राहिल्याने त्यांनी जेवण सोबत घेतले. हे जेवण सोलापुरातील शोभादेवी नगर येथील राहत्या घरी आले. जेवण गरम केल्यानंतर सर्वांनी पुन्हा सामूहिक जेवण केले. काही तासातच सर्वांना अचानक उलटी आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. जसा त्रास सोलापुरात सुरू झाला तसा तो हिरोळी (ता. आळंद, जि.गुलबर्गा) येथील नातेवाईकांना देखील होऊ लागला. सर्वांना त्रास जास्त होऊ लागल्याने त्यांना उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरHealthआरोग्य