दोन वर्षांत ३२० कोटींचे अनुदान

By Admin | Updated: June 25, 2014 01:45 IST2014-06-25T01:45:12+5:302014-06-25T01:45:12+5:30

यंदा जिल्हा नियोजन समितीमधून (डीपीसी) खूप मोठा निधी त्यांनी महापालिकेला मिळवून दिला, मात्र मनपा पदाधिकाऱ्यांनी या कामांना ‘खो’ घातला आहे़

320 crore grant in two years | दोन वर्षांत ३२० कोटींचे अनुदान

दोन वर्षांत ३२० कोटींचे अनुदान

सोलापूर: महापालिकेला गेल्या दोन वर्षांत केंद्र, राज्य शासन आणि जिल्हास्तर नियोजन समितीकडून तब्बल ३२० कोटींहून अधिक रकमेचे अनुदान मिळाले आहे़ मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी मनपाचे उत्पन्न वाढविण्याबरोबरच शासन निधी खेचून आणण्यातदेखील बाजी मारली आहे़ यंदा जिल्हा नियोजन समितीमधून (डीपीसी) खूप मोठा निधी त्यांनी महापालिकेला मिळवून दिला, मात्र मनपा पदाधिकाऱ्यांनी या कामांना ‘खो’ घातला आहे़
महापालिकेचे स्वत:चे उत्पन्न कधीही २०० कोटींवर गेले नाही, मात्र गुडेवारांनी विविध फंडे राबविले, यामुळे मनपा तिजोरीत ३०६ कोटींचे उत्पन्न ‘मार्च एण्ड’ला जमा झाले़ यामुळे मक्तेदारांची देणी असोत की कर्मचाऱ्यांना वेतनवाढ असो की नगरसेवकांचा भांडवली निधी असो सढळ हाताने सर्वांना निधी मिळाला आणि झटपट कामे मार्गी लागली ही वस्तुस्थिती आहे़ जिल्हा नियोजन समितीमधून त्यांनी ६० कोटींहून अधिक निधी मिळविला़
जिल्हास्तर योजनेतून दोन वर्षांत मिळालेला निधी- नगरोत्थान जिल्हास्तर रस्ते- ४ कोटी ४ लाख, पाणीपुरवठा ९४़२९ लाख, होनमुर्गी पाईपलाईन दुरुस्ती ४९ लाख, रस्ते-ड्रेनेज - ५ कोटी, पाणीपुरवठा- २ कोटी, स्मशानभूमी सुधारणे- ५६़२२ लाख, नगररचना अनुदान-३़३९ कोटी, अग्निशमन सुधारणा- ४़६ कोटी, डीपीडीसी आमदार फंड- ५ लाख, खासदार फंड- ९४ लाख, नागरी दलितेतर अनुदान- २३़८४ लाख, अंगणवाडी केंद्र इमारती बांधकाम- ४़५० लाख, टंचाई कामांतर्गत पाणीपुरवठ्यासाठी- १़३७ कोटी, पुरातन वास्तू संवर्धन अनुदान- ४५ लाख, नागरी दलित वस्ती पाणीपुरवठा- ३३़१९ लाख, दलित वस्ती सुधारणा- ३़१२ कोटी, सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे- १़४० कोटी, स्कॅनर खरेदीकरिता अनुदान- ३६़९६ लाख, नगरोत्थान महाअभियान जिल्हास्तर विविध कामे- २०़५६ कोटी. गेल्या दोन वर्षांत ४४़८३ कोटींचे अनुदान मिळाले असले तरी चालू वर्षात सन २०१४-१५ मध्ये गुडेवार यांनी ६० कोटींहून अधिक निधी डीपीसीमधून मंजूर केला आहे़
केंद्र आणि राज्य शासनाकडून मिळालेले अनुदान- एलबीटी करापोटी अनुदान - १५ कोटी, मुद्रांक शुल्क (१ टक्का)- २५़४० कोटी, रस्ता अनुदान- ९़३५ कोटी, अल्पसंख्याकबहुल क्षेत्र विकास अनुदान- ३९़८४ लाख, अनुसूचित जाती व नवबौद्ध घरकूल योजना- २५़६९ कोटी, महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान ड्रेनेज अनुदान - २६़८४ कोटी, रस्ते अनुदान - ४६़९४ कोटी, यूआयडीएसएसएमटी अनुदान- ३२़३८ कोटी, विशेष अनुदान- १० कोटी, मनपा क्षेत्रात प्राथमिक सोयी पुरविणे विशेष अनुदान- २३ कोटी, डॉ़ बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजना- १़६८ कोटी, १३ वा वित्त आयोग अनुदान- ४६़६७ कोटी, घर तेथे शौचालय अनुदान- १०़९१ कोटी, अग्निशमन सेवेचे बळकटीकरण- २३़९६ लाख, ऊर्जा संवर्धन प्रकल्प राबविणे- २० लाख ़
गेल्या दोन वर्षांत केंद्र आणि राज्य शासनाकडून मनपाला २७४ कोटींचे अनुदान मिळाले आहे़ चालू वर्षात देखील यात दुपटीने वाढ होणार आहे़ २०० बससाठी ११२ कोटींचे अनुदान मिळणार आहे़ जिल्हा नियोजन समितीमधून सन २०११-१२ मध्ये ४़१२ कोटी, सन २०१२-१३ मध्ये ५़५४ कोटी, सन २०१३-१४ मध्ये ३़८२ कोटी अनुदान मिळाले़ चालू वर्षात गुडेवार यांनी डीपीसीतून ६० कोटींहून अधिक निधी मंजूर करुन घेतला आहे़

Web Title: 320 crore grant in two years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.